Join us

माझ्या करिअरमध्ये 'या' क्रिकेटरचं मोठं योगदान, बुमराह थेट न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजाला दिलं यशाचं श्रेय 

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 10:02 IST

Open in App

मुंबई : माझ्या कारकिर्दीला झळाळी देण्यात न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज व मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंड याचे मोठे योगदान असल्याचे गोलंदाज जसप्रीत बुमराह याने म्हटले.

मुंबई इंडियन्सने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत बुमराह म्हणाला, ‘मी नेहमी बॉंडकडून टिप्स घेतो. प्रत्येकवर्षी शिकण्याचा प्रयत्न करतो आणि पुढेदेखील काही नव्या गोष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न असेल.  बाँड आणि माझ्यात फार चांगले संबंध असून, बॉंड खेळत असतानापासून मी त्याच्या गोलंदाजीचा चाहता राहिलो आहे. आता देशाकडून खेळताना अनेकदा त्याचे मार्गदर्शन घेतो. सर्वप्रथम २०१५ला मी बॉंडला भेटलो. लहान असताना त्याची गोलंदाजी पाहणे रोमहर्षक होते. मैदानावर नेमके काय करायचे याबद्दल बॉंडने मला वारंवार मदत केली.’ 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघक्रिकेट सट्टेबाजीन्यूझीलंड