Join us

वर्ल्डकपमध्ये शमीची तुफानी कामगिरी, आता हसीन जहाँने दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाली..

Mohammed Shami: न्यूझीलंडविरुद्धच्या भेदक गोलंदाजीनंतर क्रिकेट जगतासह सर्वच क्षेत्रातून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 19:51 IST

Open in App

यंदाच्या आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये मोहम्मद शमीने त्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांची दाणादाण उडवली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात मोहम्मद शमीने अधिकच भेदक गोलंदाजी करताना ७ बळी टिपले. या सामन्यात मोहम्मद शमीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या कामगिरीनंतर क्रिकेट जगतासह सर्वच क्षेत्रातून शमीवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या कामगिरीनंतर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

मोहम्मद शमीची क्रिकेट कारकीर्द दिवसेंदिवस बहरत असली तरी त्याच्या वैयक्तिक जीवनात मात्र मोठी उलथापालथ झालेली आहे. शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद जगजाहीर आहे. दरम्यान, दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला नसला तरी दोघेही वेगळे राहत आहेत. तसेच हसीन जहाँ शमीवर नेहमीच बेछूट आरोप करत असते. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या कामगिरीनंतर हसीन जहां हिने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सोशल मीडियावर नेटिझन्सकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.  

हसीन जहाँ हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. नेटिझन्सच्या मते या पोस्टच्या माध्यमातून हसीन जहाँ तिच्या मनाची अवस्था व्यक्त करत आहे. ती एका गाण्यावर लिप्सिंग करताना आणि लाजताना दिसत आहे. तिने या व्हिडीओला प्योर लव्ह अशी कॅप्शन दिली आहे. हसीम जहाँ हिने ज्या गाण्यावर व्हिडीओ बनवला आहे. त्यामधील शब्द तेरे नाम से ही मुझको दुनियावाले जानेंगे. तेरी सूरत देखकरही लोग मुझे पहचानेंगे, असे आहेत. 

हसीन जहाँचं हे रिल्स व्हायरल झाल्यानंतर मोहम्मद शमीचे फॅन्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तुला पश्चाताप तर खूप होत असेल, असं एकानं लिहिलं आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये हसीन जहाँने मी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाला शुभेच्छा देईन. मात्र मोहम्मद शमीला देणार नाही, असं म्हटलं होतं.  

टॅग्स :मोहम्मद शामीरिलेशनशिपपरिवारवन डे वर्ल्ड कप