शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 05:31 PM2019-11-17T17:31:14+5:302019-11-17T17:33:34+5:30

whatsapp join usJoin us
Shami and Mayank jump in order; Place of honor | शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

शमी आणि मयांकची क्रमवारीत झेप; पटकावले मानाचे स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारत विरुद्ध बांगालादेश यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि मोहम्मद शमी यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. या कागिरीचा फायदा या दोघांनाही आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत झालेला पाहायला मिळाला.

मयांककने या सामन्यात द्विशतकी खेळी साकारली, तर शमीने सामन्यात सात विकेट्स मिळवल्या. या कामगिरीच्या जोरावर या दोघांनी आयसीसीच्या क्रमवारीत झेप घेतली आहे. शमीने तर माजी कर्णधार कपिल देव आणि जसप्रीत बुमरा यांच्यानंतर मानाचे स्थान पटकावले आहे.

कसोटी सामन्यात २४३ धावांची खेळी साकारत मयांकने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या कामगिरीमुळे मयांकने आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत अकरावे स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा माी कर्णधार स्टीव्हन स्मिथ अव्वल स्थानावर आहे, तर दुसरे स्थान भारताचा कर्णधार कोहलीने पटकावले आहे.

Image

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीमध्ये शमीने सातवे स्थान पटकावले आहे. कपिल देव आणि बुमरा यांच्यानंतर शमी हा हे स्थान पटकावणारा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

वेगवान गोलंदाजांच्या आणखी एका दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने बांगलादेशचा पहिल्या कसोटी सामन्यात शनिवारी येथे तिसऱ्या दिवशी एक डाव १३० धावांनी पराभव केला. यासह दोन सामन्याच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली.

भारताने सकाळी आपला पहिला डाव ६ बाद ४९३ धावसंख्येवर घोषित करीत ३४३ धावांची मोठी आघाडी घेतली होती. पहिल्या डावात केवळ १५० धावा करणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही विशेष योगदान देता आले नाही. त्यांचा दुसरा डाव २१३ धावात संपुष्टात आला. आता उभय संघांदरम्यान २२ नोव्हेंबरपासून कोलकातामध्ये दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. ही लढत गुलाबी चेंडूने खेळली जाईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असून या शानदार विजयासह भारताने ६० गुणांची कमाई केली. यासह भारताच्या खात्यावर एकूण ३०० गुणांची नोंद असून भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी भक्कम केले आहे.

भारताच्या विजयाचे शिल्पकार वेगवान गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज मयांक अगरवाल ठरले. मयांकने २४३ धावांची शानदार खेळी केली. त्यासाठी त्याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड झाली. पहिल्या डावात तीन बळी घेणाºया मोहम्मद शमीने दुसºया डावात ३१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. उमेश यादव (२/५१) आणि इशांत र्श्मा (१/३१) यांची त्याला योग्य साथ लाभली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन (३/४२) याचेही योगदान उल्लेखनीय ठरले. भारताचा बांगलादेशविरुद्ध हा १० सामन्यांतील आठवा विजय आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने १० व्यांदा डावाच्या अंतराने विजय मिळवला असून हा भारतीय विक्रम आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ९ सामन्यांच्या डावाच्या फरकाने विजय मिळवले होते.

बांगलादेशतर्फे दुसºया डावात केवळ अनुभव मुशफिकूर रहीमने काही अंशी संघर्ष केला. त्याने सुरुवातीला मिळालेल्या जीवदानानंतर १५० चेंडूंत ६४ धावा केल्या. मुशफिकुरने लिट्टन दास (३५) याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी ६३ धावा आणि मेहदी हसन मिराजसोबत (३८) सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली.

Web Title: Shami and Mayank jump in order; Place of honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.