क्रिकेटर जगतातील स्टार क्रिकेटपटू अन् सिने क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री यांच्यातील लव्ह अफेअर्स हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. फिल्डबाहेरील प्रेमाच्या या खेळात काही जोड्या जमल्या अन् काही जोड्यांतील प्रेमाचा खेळ डेटिंगपर्यंतच मर्यादित राहिल्याचेही पाहायला मिळाले. त्यात पाकिस्तान क्रिकेटर्ससंदर्भातील ही गोष्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पाक सिनेसृष्टीतील काही अभिनेत्रींनी पाकिस्तानी क्रिकेटर्सवर सोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटवर फ्लर्ट करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भातील प्रश्नावर आता पाकिस्तानचा क्रिकेटर शादाब खान याने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाक क्रिकेटरनं आरोप करणाऱ्या अभिनेत्रींची घेतली फिरकी
पाक क्रिकेटर शादाब खान 'हँसना मना है' या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला चित्रपट अन् मालिकेतील अभिनेत्रींना पाक क्रिकेटर्स खरंच मेसेज करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. याच उत्तर देताना पाक क्रिकेटरनं आरोप करणाऱ्या अभिनेत्रींचीच फिरकी घेतली. कोणत्याही अभिनेत्रीचं नाव न घेता शादाबनं प्रसिद्धीसाठी काही अभिनेत्री हा ड्रामा करतात अन् गोष्टी फुगवून सांगतात, असे म्हटले आहे.
क्रिकेटर एखाद्या अभिनेत्रीला मेसेज करत असेल तर...
जिओ न्यूजच्या ‘हँसना मना है’ शोमध्ये सहभागी झालेल्या पाक क्रिकेटर शादाब खानला प्रश्न विचारण्यात आला होता की, बहुतांश महिला अभिनेत्रींनी असा दावा केलाय की, अनेक पाक क्रिकेटर्स त्यांना सोशल मीडियावर मेसेज करतात. तू कधी कुणाला मेसेज केला आहेस का? यावर शादाब खान म्हणाला की, क्रिकेटर्स मेजेस करत असले तरी त्यात चुकीच काय वाटत नाही.
आवडत नसेल तर गप्प बसा, रिपल्या कशाला द्यायचा?
शादाब खान पुढे म्हणाला की, सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाकडे एखाद्याला ब्लॉक करण्याचा पर्याय आहे. जर तुम्हाला आवड नसेल तर रिप्लाय देऊ नये. गप्प बसावे. पण तसं होत नाही. चॅटिंगमध्ये त्यांनाही रस असतो. लोकप्रियता मिळवण्याच्या हेतूनेच अभिनेत्रींकडून हा सर्व प्रकार घडतोय, असा आरोपही यावेळी पाक क्रिकेटरनं केला आहे.
पाक क्रिकेटर्स मेसेज करतात, या अभिनेत्रींनी केला होता दावा
काही दिवसांपूर्वी पाक अभिनेत्री नवल सईद हिला एका शोमध्ये कुण्या सिंगल क्रिकेटर्संनं कधी मेसेज केलाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी ती म्हणाली होती की, यासाठी सिंगलच असायला पाहिजे असं का वाटतं. विवाहित क्रिकेटर्सही हा उद्योग करतात. क्रिकेटर्सच हे वागणं बरोबर नाही. अभिनय क्षेत्रातील मंडळींपेक्षा अनेक लोक क्रिकेटर्सला आदर्श मानतात, असे ती म्हणाली होती. तिच्याशिवाय मोमिना इक्बाल हिनेही क्रिकेटर वारंवार मेसेज करतात, असा आरोप केला होता. टिकटॉक फेम शाह ताज खान हिने तर शादाब खान मित्र असल्याचा दावा केला होता. आम्ही दोघेसोशल मीडियाच्या माध्यमातून चॅटिंग करतो, असेही ती म्हणाली होती.
शादाब खान हा आता वैवाहिक आयुष्य जगत आहे. त्याने पाकचा माजी क्रिकेटपटू सक्लेन मुश्ताक याची लेक मलायकाशी लग्न केले आहे. २०२३ मध्ये शादाब अन् मालयाक यांचा निकाह झाला होता.
Web Title: Shadab Khan Opens Up On Actresses Accusing Cricketers Of Texting messages Them On Social Media
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.