Join us

ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

वैयक्तिक धावा करण्यापेक्षा संघाला मॅच आणि ट्रॉफी जिंकून देणं महत्त्वाचं वाटते, नेमकं काय म्हणाला रोहित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 20:44 IST

Open in App

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने सर्वाधिक IPL ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण एकदाही त्याला ऑरेंज कॅप पटकवता आलेली नाही. यावरून त्याच्या कामगिरीवर अनेकदा प्रश्नचिन्ह देखील उपस्थितीत केले जाते. पण रोहितला त्याचा कोणताही फरक पडत नाही. हंगामात भलेही ४०० धावा नावे असू देत पण ट्रॉफी संघाने जिंकली पाहिजे, असे रोखठोक मत त्याने एका मुलाखतीत मांडल्याचे पाहायला मिळाले. या मुलाखतीत  रोहित शर्मानं हंगामात ६००-७०० धावा करण्यासंदर्भात केलेले वक्तव्य हे विराट कोहलीला टोमणा मारल्यासारखे आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे. इथं जाणून घेऊयात नेमक तो काय म्हणाला आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पहिल्या ६ षटकात रिस्क घेऊनच खेळतो रोहित शर्मा याने नुकताच आपला ३८ वा बर्थडे साजरा केला. या निमित्ताने त्याने क्रीडा पत्रकार विमल कुमार यांना खास मुलाखत दिली. यावेळी रोहित म्हणाला की, "धावा करणे कुणाला आडत नाही? ज्यावेळी धावा होत नाहीत, संघाला योगदान देऊ शकत नाही त्यावेळी दु:ख नक्कीच होते. पण मी माझ्या खेळण्याचा अप्रोच बदलणार नाही. रिस्क घेईन खेळत असलो तरी एकच चूक पुन्हा पुन्हा होणार नाही याची काळजी घेतो. पहिल्या ६ षटकात चान्स घेऊनच खेळण्याला पसंती देतो. त्यानंतर खेळ कसा चालवायचा तो प्लॅनही तयार असतो. माझा गेम असाच आहे."

IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?

६००, ७०० किंवा ८०० धावा करुन  उपयोग काय? नेमकं काय म्हणाला रोहित?

आयपीएलच्या एका हंगामात ५००-६०० धावा करण्यासंदर्भातील प्रश्नावर रोहित म्हणाला की,  "मला इम्पॅक्ट टाकणारी खेळी करायची असते. हंगामात वैयक्तिक धावांचे लक्ष डोक्यात ठेवून कधीच खेळत नाही.  ६००, ७०० किंवा ८०० धावा करुन मॅच आणि ट्रॉफी जिंकता आली नाही तर त्या धावांचा काहीच उपयोग नाही, असे रोहित म्हणाला. हिटमॅन रोहित शर्माचे हे वक्तव्य आरसीबी चाहत्यांसाठी झोंबणारेच आहे. कारण विराट कोहली हा सातत्याने धावा करतो. पण एकदाही आरसीबीच्या संघाने ट्रॉफी जिंकलेली नाही. पण रोहितनं यामागचं कारण सांगितल्यामुळे त्याने रोहितला टोमणा मारलेला नाही हे देखील स्पष्ट होते. 

 मोठ्या वक्तव्याला दिला आपलाच दाखला

२०१९ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रोहित शर्मानं दमदार खेळी केली होती. पण त्यावेळी भारतीय संघाला फायनलही गाठता आली नव्हती. याच तेव्हापासूनच मी धावा किती केल्या यापेक्षा संघाला मी केलेल्या धावांचा फायदा किती झाला त्याचा विचार करतो, असेही रोहित शर्मानं सांगितले आहे. 

टॅग्स :इंडियन प्रिमियर लीग २०२५रोहित शर्माविराट कोहलीमुंबई इंडियन्सइंडियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट