सलामीवीर जॉर्ज मन्सीच्या आक्रमक खेळीच्या जोरावर स्कॉटलंडच्या संघाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी धावसंख्या उभारत नवा इतिहास रचला आहे. पहिल्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धे खेळणाऱ्या इटली विरुद्धच्या सामन्यात स्कॉटलंडच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद २०७ धावा केल्या. या विक्रमी धावसंख्येसह स्कॉटलंडचा संघ टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला असोसिएट संघ ठरला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिल्यांदा फलंदाजी करताना धमाका! या पठ्ठ्यानं तर ४४० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
मन्सीने अवघ्या ५४ चेंडूंत ८४ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीत त्याच्या बॅटमधून १३ चौकार आणि २ षटकार पाहायला मिळाले. मन्सीला मायकेल जोन्सनं उत्तम साथ दिली. जोन्सने ३० चेंडूंत ३७ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत ब्रँडन मॅकमलनने जबाबदारीनं खेळताना १८ चेंडूत नाबाद ४१ धावांची खेळी केली. यात त्याने ४ उत्तुंग षटकार मारले. अखेरच्या षटकात मायकेल लीस्कने तर कहरच केला. अवघ्या ५ चेंडूत त्याने ४४० च्या स्ट्राइक रेटनं नाबाद २२ धावा केल्या.
Ind vs Pak सामन्यावरून तणाव वाढत असताना टीम इंडियाने अचानक घेतला मोठा निर्णय
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील असोसिएट संघाची पहिली २००+ धावसंख्या, इथं पाहा रेकॉर्ड
- २०७/४ – स्कॉटलंड विरुद्ध इटली, कोलकाता, २०२६ (पहिला डाव)
- १९७/३ – अमेरिका विरुद्ध कॅनडा, डॅलस, २०२४ (दुसरा डाव)
- १९४/५ – कॅनडा विरुद्ध अमेरिका, डॅलस, २०२४ (पहिला डाव)
- १९३/४ – नेदरलँड्स विरुद्ध आयर्लंड, सिल्हेट, २०१४ (दुसरा डाव)
- १८९/४ – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स, सिल्हेट, २०१४ (पहिला डाव)
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत असोसिएट संघाची १००+ धावांची सलामी भागीदारी
- १३१* – आकिब इलियास, जतिंदर सिंग (ओमान) विरुद्ध पापुआ न्यू गिनी, २०२१
- १२६ – मायकेल जोन्स, जॉर्ज मन्सी (स्कॉटलंड) विरुद्ध इटली, २०२६
ज्या इटलीनं टी-२० वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर काढलं त्यांच्याविरुद्धच मोहिमेची सुरुवात करण्याचं भाग्य लाभलं अन्....
इटलीचा संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कप स्पर्धसाठी पात्र ठरला आहे. कमालीची गोष्ट ही की, स्कॉटलंडच्या संघाला पराभूत करत त्यांनी यंदाच्या हंगासाठी आपली पात्रता सिद्ध केली होती. अर्थात स्कॉटलंडचा संघ अपात्र ठरला. पण ICC वर्ल्ड कप स्पर्धेच्या काही दिवसांआधीच स्कॉटलंडच नशीब उघडलं. बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यावर ICC नं या संघासाठी वर्ल्ड कप स्पर्धेच दार उघडलं. ज्या इटलीनं टी-२० वर्ल्ड कपच्या शर्यतीतून बाहेर काढलं त्यांच्याविरुद्धच त्यांनी यंदाच्या हंगामाच्या मोहिमेला सुरुवात केली. एवढेच नाही तर ऐतिहासिक धावसंख्याही उभारली.