बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार

गांगुलीनेच माजी खेळाडूंचा हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 21:23 IST2019-10-14T21:23:05+5:302019-10-14T21:23:56+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Saurav Ganguly to solve questions of players like Sachin Tendulkar, Rahul Dravid, VVS Laxman after becoming BCCI president | बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार

मुंबई : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता बीसीसीआयचा अध्यक्ष होणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर माजी क्रिकेटपटूंचे महत्वाचे प3श्न सोडवणार असल्याचे आता समोर आले आहे. गांगुलीनेच माजी खेळाडूंचा हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे.

याबाबत गांगुली म्हणाला की, " आजी आणि माजी क्रिकेटपटूंना सध्या काही समस्या जाणवत आहेत. या समस्या मला माहिती आहेत आणि त्या समस्या मी सोडणार आहे. सध्याच्या घडीला माजी क्रिकेटपटूंना परस्पर हितसंबंधांच्या समस्या जाणवत आहेत. या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने मी काही पावलं उचलेन."

  आक्रमक नेतृत्वाने क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी करणारा सौरव गांगुलीची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राजीव शुक्ला यांनी ही घोषणा केली,

जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढ्य क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन या दोन माजी गट आमने-सामने होते. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शह-काटशहाचे अनेक डाव रंगले. एका गटाने सौरव गांगुलीचे नाव पुढे केले होते. तर श्रीनिवासन यांच्या गटाने आपले वजन बृजेश पटेल यांच्या पारड्यात टाकले होते. या बैठकीत सीओए विरुद्ध देशातील सर्व क्रिकेट संघटना मिळून मोर्चेबांधणी करत होत्या. अखेर अध्यक्षपदासाठी झालेल्या खलबतांमध्ये गांगुलीचे पारडे जड ठरले.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. अखेरीस सौरव गांगुलीच्या नावावर एकमत झाले. बृजेश पटेल यांना आयपीएलचे चेअरमन बनवण्यावर एकमत झाले. अमित शहांचे चिरंजीव जय शहा यांची सचिवपदी निवड झाली तर अरुण सिंह ठाकूर यांची खजिनदारपदी निवड झाली.

बीसीसीआच्या अध्यक्षपदासाठी बरेच राजकारण झाले, पण त्यामध्ये अखेर बाजी मारली ती भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने. जेव्हा ही खलबत सुरु होती तेव्हा गांगुलीला उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पण तिथून तो थेट अध्यक्ष झाला. ही जादूची कांडी नेमकी फिरली तरी कशी, याची उत्सुकता साऱ्यांना आहे.

बीसीसीआयवर आपल्या गटाचे नियंत्रण असावे, यासाठी अनुराग ठाकूर आणि एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी जोर लावला होता. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी ब्रिजेश पटेल, यांचे नाव सुचवले होते आणि ते आपल्या मतावर ठाम होते.

Web Title: Saurav Ganguly to solve questions of players like Sachin Tendulkar, Rahul Dravid, VVS Laxman after becoming BCCI president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.