Join us

Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं

बुचीबाबू स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराजच्या भात्यातून आली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:16 IST

Open in App

Buchi Babu Trophy 2025, Sarfaraz Khan Century For Mumbai :  शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकताच इंग्लंडचा दौरा केला. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत मुंबईकर सरफराज खानला संधी मिळणं अपेक्षित होतं. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासोबत असलेल्या सरफराजला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेसाठी टीम इंडियात स्थानच मिळाले नाही. संघाबाहेर काढल्यावर सरफराजन खान याने फिटनेसवर फोकस केला अन् आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये संधी मिळताच पुन्हा एकदा आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून देत आगामी कसोटीसाठी आपली दावेदारी भक्कम केलीये.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बुचीबाबू स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सरफराजच्या भात्यातून आली सेंच्युरी

तमिळनाडूतील चेन्नईच्या मैदानात TNCA XI विरुद्धच्या सामन्यात मुंबई संघाकडून खेळताना सरफराज खान याने पहिल्याच दिवशी शतकी खेळीनं लक्षवेधून घेतलं. संघ अडचणीत असताना तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ९२ चेंडूत शतक साजरे केले. आकाश पारकरच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी १२९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत त्याने संघाचा डाव सावरला. 

Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?

धमाकेदार खेळीनंतर रिटायर्ड हर्ट होऊन परतला

सरफराज खान याने तमिळनाडू संघाविरुद्धच्या सामन्यात ११४ चेंडूंचा सामना करताना १३८ धावा केल्या. त्याची ही  धमाकेदार खेळी १० चौकार आणि ६ षटकारांनी सजलेली होती. रिटायर्ड हर्टच्या रुपात माघारी फिरण्याआधी त्याने इंग्लंड दौऱ्यावर संघातून वगळल्याचा रागच काढला. या खेळीसह त्याने घरच्या मैदानात होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी आपली दावेदारी ठोकलीये.

घरच्या मैदानातील मालिकेसाठी सरफराज तयार, पण...

ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोरला खेळवण्यात येईल. या मालिकेसाठी सप्टेंबरमध्ये टीम इंडियाची घोषणा होईल. दोन महिने फिटनेसवर भर घेतल्यावर आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार सुरुवात करत आगामी कसोटी मालिकेसाठी तयार असल्याचे संकेतच या मुंबईकरानं दिले आहेत. पण त्याच्या या खेळीला दाद देत बीसीसीआय इंग्लंड दौऱ्यातील चूक भरून काढणार की, त्याला वेटिंगवर ठेवणार? ते पाहण्याजोगे असेल.

टॅग्स :सर्फराज खानबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध वेस्ट इंडिज