Sarfaraz Khan Hits Double Hundred Hyderabad vs Mumbai Ranji Trophy Match : मुंबई संघाच्या मध्यफळीचा कणा सरफराज खान याने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील दमदार द्विशतक झळकावले आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्या दिवशीच्या खेळात शतकाला गवसणी घातल्यावर दुसरा दिवस त्याने द्विशतकासह गाजवला. या खेळीसह त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईच्या संघाने हैदराबादसमोर ८ बाद ५३३ धावांचा डोंगर उभारल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये द्विशतकी 'षटकार'
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सरफराज खानने २०६ चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं. २१९ चेंडूंत त्याने ९ षटकार आणि १९ चौकारांच्या मदतीने २२७ धावा केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून आलेले हे सहावे द्विशतक ठरले. पहिल्या दिवसाअखेर तो १४२ धावांवर नाबाद होता. ही खेळी आणखी मोठी करत त्याने खास डाव साधला.
Two Hat-tricks in 24 Hours: अवघ्या २४ तासांत दोन हॅट्रिक; दुबईच्या मैदानात घडला मोठा इतिहास!
५० दिवसांत तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक
मुंबईचा हा स्टार फलंदाज अवघ्या ५० दिवसांच्या आत देशांतर्गत क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात यशस्वी ठरला आहे. २ डिसेंबर रोजी त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आसामविरुद्धच्या सामन्यात अवघ्या ४७ चेंडूत शतक झळकावले होते. ३१ डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोव्याविरुद्ध त्याने ७५ चेंडूंत १५७ धावांची धमाकेदार खेळी केल्याचे पाहायला मिळाले होते. त्यात आता रणजी ट्रॉफी स्पर्धेतील कडक द्विशतकाची भर पडली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीसह त्याने पुन्हा एकदा बीसीसीआय निवडकर्त्यांना आपल्यातील धमक दाखवली आहे. नव्या वर्षात पुन्हा त्याला टीम इंडियात एन्ट्री मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५००० धावांचा टप्पाही केला पारराजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतकी षटकार मारण्याआधी त्याने ५००० धावांचा पल्लाही गाठला होता. आतापर्यंत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६४.३ च्या सरासरी आणि ७०.१० च्या स्ट्राइक रेटनं ६१ सामन्यातील ९१ डावात ५०९० धावा काढल्या आहेत.
Web Summary : Sarfaraz Khan smashed a double century in the Ranji Trophy. He reached the milestone in 206 balls, scoring 227 runs with 9 sixes and 19 fours. This is his sixth double century in first-class cricket. Earlier, he scored centuries in T20 and ODI formats within 50 days. He also crossed 5000 runs in first-class cricket.
Web Summary : सरफराज खान ने रणजी ट्रॉफी में दोहरा शतक जड़ा। उन्होंने 206 गेंदों में यह मुकाम हासिल किया, जिसमें 9 छक्के और 19 चौकों की मदद से 227 रन बनाए। यह प्रथम श्रेणी क्रिकेट में उनका छठा दोहरा शतक है। इससे पहले, उन्होंने 50 दिनों के भीतर टी20 और वनडे में भी शतक बनाए थे। उन्होंने प्रथम श्रेणी क्रिकेट में 5000 रन भी पूरे किए।