Sarfaraz Khan 2nd Century: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाच्या ताफ्यात असलेल्या सरफराज खानला इंग्लंड दौऱ्यात संघाबाहेर करण्यात आले. पुन्हा एकदा दुर्लक्षित झाल्यावर या पठ्ठ्यानं जिममध्ये मेहनत घेत फिटनेसवर काम केले. अल्पावधीत १७ किलो वजन घटवत फॅट टू फिट प्रवासाने सर्वांना आश्चर्यचकित केल्यावर आता तो मैदानात फटकेबाजीच्या खास नजरणाऱ्यासह चर्चेत आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सरफराजच्या भात्यातून आले आठवड्यातील दुसरे शतक
वेस्ट इंडिजच्या कसोटी मालिके आधी सरफराज खान मुंबई संघाकडून बुची बाबू २०२५ स्पर्धेत आपल्या भात्यातील धमक दाखवून देत आहे. या स्पर्धेतील सलामीच्या दिवशी TNCA XI विरुद्ध शतकी खेळी केल्यावर आता मंगळवारी (२६ ऑगस्ट) सरफराज खान याने छत्तीसगड विरुद्ध ९९ चेंडूत शतक साजरे केले आहे. आठवड्यात त्याच्या भात्यातून आलेले हे दुसरे शतक ठरले. या कामगिरीसह त्याने पुन्हा एकदा टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे.
वर्ल्डकप २०११ फायनल सामन्यात धोनी फलंदाजीसाठी वर का आला? सचिननं सांगितली अंदर की बात!
बुची बाबू स्पर्धेत शतकी सलामी
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेल्या सरफराज खान याने बुची बाबू २०२५ स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात TNCA XI विरुद्ध ९२ चेंडूत ९ चौकारासह ३ षटकाराच्या मदतीने शतक ठोकले होते. आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत आता त्याने छत्तीसगड विरुद्धही शतक ठोकले आहे.
पदार्पणाची संधी मिळाली, पण...
सरफराज खान याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने कमालीची कामगिरी करुन दाखवल्यावर २०२४ मध्ये त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातून कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. आतापर्यंत ६ कसोटी सामन्यातील ११ डावात त्याने टीम इंडियाकडून ३७.१० च्या सरासरीने ३७१ धावा केल्या आहेत. यात एका शतकासह ३ अर्धशतकांचा समावेश आहे. १५० ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंड दौऱ्यावरही त्याला संघात स्थान मिळायला हवे होते, पण त्याला पुन्हा डावलण्यात आले. आता तो पुन्हा कमबॅकसाठी कंबर कसताना दिसतोय.
Web Title: Sarfaraz Khan Brings Up His Second Consecutive Ton In The Buchi Babu Tournament For Mumbai
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.