Join us
Daily Top 2Weekly Top 5

"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला

उप कर्णधार शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांनी विकेट किपर बॅटरला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती दिली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:12 IST

Open in App

सलामीवीराच्या रुपात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तीन शतकासह खास छाप सोडूनही यंदाच्या वर्षात संजू सॅमसन दुर्लक्षित राहिला. आशिया कप स्पर्धेसाठी शुभमन गिल संघात आला अन् त्याचे संघातील स्थान धोक्यात आले. पण वर्ल्ड कप स्पर्धेच्या संघ निवडी वेळी एखाद्या सामन्याला एका विकेटसह कलाटणी मिळावी तशी BCCI च्या एका धाडसी निर्णयामुळे संजू सॅमसनचा वर्ल्ड कप खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. उप कर्णधार शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवत बीसीसीआय निवडकर्त्यांनी विकेट किपर बॅटरला सलामीवीराच्या रुपात पहिली पसंती दिली आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संधी अन् संजूनं वर्ल्ड कपचं तिकीट केलं बूक

अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी२० सामन्यात संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले. एवढेच नाही तर अभिषेक शर्माच्या साथीनं त्याने भारतीय संघाच्या डावाची सुरुवातही केली. ३७ धावांच्या धमाकेदार खेळीसह त्याने सलामीवीराच्या रुपात शुभमन गिलपेक्षा सर्वोत्तम पर्याय असल्याचे दाखवून दिले. या खेळीसह त्याने वर्ल्ड कपचं तिकीटही बूक केले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत संधी मिळाली असली तरी संजू सॅमसन याने सावध राहिले पाहिजे, असा सल्ला माजी वर्ल्ड चॅम्पियन सलामीवीर के श्रीकांत यांनी संजूला दिला आहे. 

VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला

के. श्रीकांत नेमकं काय म्हणाले?

आपल्या यूट्यूब चॅनेलवरील खास शोमध्ये के श्रीकांत यांनी संजू सॅमसनवर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले की,  "संजूने खूप छान फलंदाजी केली. काही स्ट्रोक्स अप्रतिम होते. पण मी त्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की, ३७ करून बाद होऊ नकोस. चांगली सुरुवात मिळाल्यावर या धावसंख्या ७३ धावांत रुपांतरित करण्यावर भर दे.  जर हे केलेस त तुला कोणीही संघाबाहेर काढू शकणार नाही. ३०-४० धावांची खेळी इम्पॅक्टफुल असली तरी लोक अशी खेळी लक्षात ठेवत नाहीत. मोठी खेळीच लक्षवेधी ठरते, असे सांगत मोठी खेळी करण्यावर लक्षकेंद्रीत करावे लागेल, असे के श्रीकांत यांनी म्हटले आहे.

संजूची निवड झाली, पण...

तीन शतके झळकावल्यावरही संजू सॅमसनला बाकावर बसावे लागले होते. त्यामुळे संघात स्थान मिळाल्यावर कामगिरीतील सातत्य टिकवण्याच त्याच्यासमोर आव्हान असेल. छोटीखानी खेळी इम्पॅक्ट टाकणारी असली तरी त्याच्यासोबत ईशान किशनही टी-२० वर्ल्ड कप संघात आहे. त्यामुळे संजूला आपले स्थान भक्कम करण्यासाठी जपून आणि मोठी खेळी करण्याच्या इराद्याने रणनिती आखावी लागेल.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 1983 World Champion's advice: No one can remove you, Sanju!

Web Summary : Despite T20 centuries, Sanju Samson was overlooked. K. Srikkanth advises him to convert good starts into big scores to secure his place in the World Cup team, emphasizing consistency for a lasting impact.
टॅग्स :संजू सॅमसनभारतीय क्रिकेट संघट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024इशान किशनशुभमन गिल