Shubman Gill Sanju Samson Photo Controversy: भारतीय संघाने नुकताच टी२० विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यात भारताने तुल्यबळ न्यूझीलंडच्या संघाचा पराभव केला. भारतीय संघाकडून तुफानी खेळी करणाऱ्या संजू सॅमसनची वाहवा करण्यात आली. सुपर-८ मधील एक सामना गमावल्यानंतर संजू सॅमसनला संघात घेण्यात आले होते. त्यानंतरच्या तीन सामन्यात संजूने तडाखेबाज फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्या उभारून दिल्या. त्यासोबत संघाला विजेतेपदही मिळवून दिले. पण याच संजू सॅमसनचा फोटो संघाच्या ग्रुप फोटोमधून गायब असल्याचे दिसले. हा प्रकार BCCI किंवा ICC ने केलेला नसून, भारताचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिल याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दिसला. त्यामुळे आता यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?
टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर शुबमन गिलने भारतीय संघाचा ट्रॉफीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या. मात्र, या फोटोमध्ये संजू सॅमसन गायब होता. गिलने इंस्टाग्रामवर संघाच्या ट्रॉफीचा एक सेलिब्रेशन फोटो शेअर केल्यानंतर वाद सुरू झाला, ज्यामध्ये संजू सॅमसन दिसत नव्हता. अनेक चाहत्यांनी त्याची तुलना सूर्यकुमार यादवच्या पोस्टशी केली, जिथे सॅमसन दिसत होता आणि असा दावा केला की गिलने सॅमसनला वगळण्यासाठी फोटो एडिट केला. आरोप असा आहे की गिल सॅमसनच्या यशावर जळतो, कारण सॅमसनने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे आता गिलला संघात स्थान मिळणार नाही.
गिलने पोस्ट केलेला फोटो:-
सूर्यकुमारने पोस्ट केलेला फोटो:-
गिलच्या पोस्टमागील सत्य काय?
सोशल मीडियावर केला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे आणि सत्य वेगळे आहे. फॅक्ट चेकमध्ये असे दिसून आले की गिलने काहीही एडिट केले नाही. त्या दिवशी सामन्यानंतर वेगवेगळ्या अँगलने जे फोटो काढण्यात आले, त्यापैकीच तो एक फोटो आहे. गिलने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये खेळाडूंच्या पोझिशन्स थोड्या वेगळ्या होत्या, म्हणूनच संजू सॅमसन दिसत नव्हता. यशस्वी जैस्वालनेही अभिनंदनाची पोस्ट केली होती, त्यातही सॅमसन दिसत नव्हता. शिवम दुबे आणि रविचंद्रन अश्विन यांनीही असेच फोटो पोस्ट केले. त्यामुळे गिलने ते जाणीवपूर्वक केलेले नाही हे स्पष्ट होते.
Web Summary : Controversy erupted after Sanju Samson was missing from Shubman Gill's celebratory team photo after winning the T20 World Cup. Fans alleged internal conflict, comparing Gill's post to others where Samson was visible. Fact checks revealed the claim to be false; Samson was simply out of frame.
Web Summary : टी20 विश्व कप जीतने के बाद शुभमन गिल की टीम फोटो से संजू सैमसन के गायब होने पर विवाद छिड़ गया। प्रशंसकों ने आंतरिक संघर्ष का आरोप लगाया, गिल की पोस्ट की तुलना अन्य पोस्ट से की जहाँ सैमसन दिखाई दे रहे थे। जाँच में दावा झूठा निकला; सैमसन फ्रेम से बाहर थे।