Join us  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सचिन तेंडुलकरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला...

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 5:57 PM

Open in App

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकर यानंही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

विराट कोहलीनं 'देसी गर्ल'ला टाकलं मागे; बनला इंस्टाग्रावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेला भारतीय!

यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

तेंडुलकरनं शुभेच्छा दिल्या की,''माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या सर्व कार्यांत तुम्हाला सुयश चिंतितो.''

याआधी डिसेंबर 2019मध्ये तेंडुलकरनं मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सचिन आणि उद्धव यांच्यामध्ये सुरक्षेच्या विषयावर चर्चा झाल्याचे समजते. सचिनला 'एक्स' सुरक्षेच्या यादीतन वगळल्याची माहिती काही जणांना मिळाली होती. त्यासाठी सचिनने उद्धव यांची भेट घेतल्याचे म्हटले जात आहे. आपल्या सुरक्षेत वाढ करावी, अशी विनंती सचिनने उद्धव यांना केल्याचे समजत आहे. याबाबतची माहिती 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिली होती.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा

भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य 

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत 

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिनच्या वडिलांचे निधन 

विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात

IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरउद्धव ठाकरे