बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

माझ्यासह अनेक भारतीय खेळाडूंना बीसीसीआयने दिली अव्यावसायिक वागणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 11:56 AM2020-07-27T11:56:43+5:302020-07-27T12:30:02+5:30

whatsapp join usJoin us
'Board was unprofessional while managing me towards end of my career' - Yuvraj Singh slams BCCI | बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कॅन्सरवर यशस्वी मात करून युवराज सिंगनं 2017मध्ये वन डे संघात पुनरागमन केलं. त्यानंतर 2019च्या वर्ल्ड कप पर्यंत चौथ्या स्थानावर सक्षम पर्याय मिळेपर्यंत युवीचा विचार व्हायला हवा होता, असे अनेकांचे मत होते. शिवाय भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर त्यानं 41.33 च्या सरासरीनं धावाही केल्या होत्या, परंतु तंदुरुस्तीच्या समस्येमुळे त्याला संघातील स्थान गमवावे लागले.

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर युवीला yo-yo टेस्ट पास करता आली नाही आणि त्याला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले. बीसीसीआयनं त्याला निवृत्तीच्या सामन्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु युवीनं तो अमान्य केला. पण, युवीनं yo-yo टेस्ट पास केल्यानंतरही संघ व्यवस्थापनानं त्याला निवडले नाही. 2019मध्ये युवीनं निवृत्ती जाहीर केली. निवृत्तीनंतर युवीनं बीसीसीआयवर जोरदार टीका केली.

 38 वर्षीय युवीनं सांगितलं की,''माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात बीसीसीआयनं अव्यावसायिक पद्धतीनं वागणूक दिली. पण, हे असं केवळ माझ्यासोबच नाही घडलं. हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान यांच्यासोबतची तसेच घडले. त्यामुळे भारतीय क्रिकेटचा हा एक भागच आहे, असं म्हणावं लागेल. मागे वळून पाहताना अशी अनेक उदाहरणं दिसतील.''

2012नंतर युवी भारतीय संघाचा नियमित सदस्य होता. त्यानंतर त्यानं तीन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खेळले, परंतु वन डे वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला. 2014-15च्या मोसमात युवीनं रणजी करंडक स्पर्धेत सलग तीन शतकं झळकावली, तरीही 2015च्या वन डे वर्ल्ड कपसाठीच्या संघात त्याचा विचार केला गेला नाही. 2017मध्ये त्यानं कमबॅक केलं, परंतु सात महिन्यांनंतर त्याला वगळले गेले. याकाळात त्यानं 11 वन डे व 3 ट्वेंटी-20 सामने खेळले.  

युवीनं 304 वनडे सामन्यांत 8701 धावा आणि 111 विकेट्स घेतल्या.  58 ट्वेंटी-20 सामन्यांत 1177 धावा आणि 28 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. त्यानं 40 कसोटी सामन्यांतही प्रतिनिधित्व केलं.

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

Web Title: 'Board was unprofessional while managing me towards end of my career' - Yuvraj Singh slams BCCI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.