भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

कोरोना व्हायरसच्या संकटात अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 12:31 PM2020-07-27T12:31:27+5:302020-07-27T12:32:33+5:30

whatsapp join usJoin us
Rajendra singh dhami former captain of indian wheelchair cricket team work in manrega labour; sonu sood help him | भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंडे बंद असल्यामुळे मजूरांवर मोठं संकट ओढावलं आहे. अनेक खेळाडूंनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सरकारकडून काहींना आर्थिक मदत झाली असली तरी अजून अनेक जण उपेक्षितच आहेत. यात भारताच्या माजी कर्णधाराचाही समावेश आहे. भारताचा माजी कर्णधार मनरेगात दगड फोडण्याचे काम करत आहे. त्याच्या मदतीला सरकारकडून कुणीच आले नाही, परंतु बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना संकटात सोनू सूदनं अनेक मजुरांना, विद्यार्थ्यांना मदत केली आहे. 

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

भारताच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राजेंद्र सिंग धामी याला दगड फोडण्याचं काम करावं लागत आहे.  30 वर्षीय राजेंद्र सध्या उत्तराखंड व्हिलचेअर क्रिकेट सघाचा कर्णधार आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे उप्तन्नही थांबले आणइ आता त्याला मजदूराचं काम करावं लागत आहे. 3 वर्षांचा असताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. तरीही त्यानं हिंम्मत हरली नाही आणि मैदानावर दमदार कामगिरी करत अनेक पुरस्कार जिंकले. राजेंद्रनं इतिहास विषयात मास्टर पदवी घेतली आहे आणि शिवाय त्याने बीएडही केलं आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. 

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत

''लॉकडाऊनपूर्वी मी व्हिलचेअरवर असलेल्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होतो. आता लॉकडाऊनमुळे ते काम थांबलं आहे. त्यानंतर मी पिथौरागढ या माझ्या गावी आलो. येथे माझे आई-वडील राहतात. आई-वडील म्हातारे झाले आहेत आणि मला एक बहिण आणि लहान भाऊ आहे. भाऊ गुजरात येथे एका हॉटेलमध्ये काम करतो. पण, त्यालाही नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुले मी आता मनरेगा मजदूर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून कोणतीच मदत मिळालेली नाही,''असे राजेंद्रनं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.

तो पुढे म्हणाला,''काही लोकांनी मला मदत केली. त्यात अभिनेता सोनू सूदचाही समावेश आहे. सोनू सूद यांनी मला 11 हजार रुपये पाठवले.''

Web Title: Rajendra singh dhami former captain of indian wheelchair cricket team work in manrega labour; sonu sood help him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.