Join us

Sachin Tendulkar: “प्लिज, माझे असे फोटो व्हायरल करु नका”; सचिनची चाहत्यांना कळकळीची विनंती

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी केलेले एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:14 IST

Open in App

मुंबई: भारतरत्न, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. सचिन यांच्या पोस्टना चाहत्यांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असतो. क्रिकेट जगतातील अनेकविध मुद्द्यांवर सचिन तेंडुलकर आपली रोखठोक मते व्यक्त करत असतात, खेळाडूंचे कौतुकही करताना दिसतात. कोट्यवधी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचे एक ट्विट सध्या चर्चेत असन, ते व्हायरल झाले आहे. यामध्ये सचिन यांनी एक विनंती केली असून, नेमके प्रकरण काय ते जाणून घेऊया...

सचिन तेंडुलकर यांनी केलेले एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये या ट्विटला हजारो लाईक्स, रीट्वीट्स मिळू लागले आहेत. यामध्ये सचिन यांनी आपल्या चाहत्यांसाठी एका गोष्टीचा खुलासा केला असून, त्यासंदर्भात आपल्याला अतिशय दु:ख होत असल्याचे सचिन तेंडुलकर यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर या प्रकरणी कायदेशीर मार्गाने कारवाई करणार असल्याचा इशारा सचिन तेंडुलकर यांनी दिला आहे. 

माझे असे फोटो व्हायरल करू नका

गेल्या काही दिवसांपासून सचिन तेंडुलकर यांचे फोटो काही कसिनो ब्रँड्सकडून मार्केटिंगसाठी वापरले जात असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात केलेल्या एका ट्विटमध्ये सचिन तेंडुलकर म्हणतात की, माझ्या हे लक्षात आले आहे की सोशल मीडियावर अनेक कसिनोवाल्यांकडून माझा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरून जाहिरात केली जात आहे. मी कधीही जुगार, तंबाखू किंवा मद्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समर्थन केलेले नाही. मला हे पाहून दु:ख होते की माझे फोटो लोकांमध्ये चुकीच्या गोष्टी पसरवण्यासाठी वापरला जात आहे. माझी लीगल टीम यासंदर्भात योग्य ती पावले उचलणारच आहे. पण तरी देखील मला वाटले की यासंदर्भात योग्य ती माहिती सगळ्यांना सांगणे आवश्यक आहे, असा खुलासा करणारे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे. 

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरसोशल मीडियाट्विटर
Open in App