Arjun Tendulkar Marriage Date: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरी लवकरच लग्नाची लगबग पाहायला मिळणार आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मार्च २०२६ मध्ये लग्न करणार असल्याची माहिती मिळाली आहे. प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात असलेल्या सानिया चंडोक (Saaniya Chandhok) हिच्यासोबत तो विवाहबद्ध होणार आहे. या शाही विवाह सोहळ्याची तारीख आणि ठिकाण आता समोर आले असून क्रीडा आणि व्यापार क्षेत्रातील मान्यवर या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकरची होणारी सुनबाई सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता?
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकचे लग्न कधी आणि कुठे?
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन आणि सानिया यांचा विवाह सोहळा ५ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे विधी आणि मुख्य समारंभ ३ मार्चपासून सुरू होतील. हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत आयोजित केले जाणार आहेत. तेंडुलकर कुटुंबाने हा सोहळा खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि क्रिकेट विश्वातील काही मोजकेच दिग्गज उपस्थित असतील.
कोण आहे सानिया चंडोक?
सानिया चंडोक ही मुंबईतील एका प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यातील आहे. ती प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब मुंबईतील हॉटेल आणि खाद्य उद्योगात (इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी) मोठे नाव आहे. सानिया स्वतः एक उद्योजिका असून ती 'Mr. Paws' नावाच्या पेट स्पा आणि स्टोअरची संचालक आहे. अर्जुन आणि सानिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. विशेष म्हणजे, सानिया आणि अर्जुनची बहीण सारा तेंडुलकर यांच्यातही घट्ट मैत्री आहे.
नव्या इनिंगची सुरुवात
अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा १३ ऑगस्ट २०२५ रोजी एका खाजगी समारंभात पार पडला होता. सुरुवातीला गुप्त ठेवण्यात आलेल्या या नात्याची अधिकृत कबुली स्वतः सचिन तेंडुलकरने एका 'रेडिट एएमए' (Reddit AMA) सत्रादरम्यान दिली होती. अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे. आता क्रिकेटच्या मैदानात संघर्ष करणाऱ्या अर्जुनच्या आयुष्यात सानियाच्या रूपाने एक नवी आणि आनंदी इनिंग सुरू होणार आहे.
Web Summary : Arjun Tendulkar will marry Saaniya Chandhok on March 5, 2026, in Mumbai. The pre-wedding festivities start March 3rd. Sachin Tendulkar confirmed the engagement, with close friends and family attending the private event. Saaniya is a businesswoman in the pet care industry.
Web Summary : अर्जुन तेंदुलकर 5 मार्च, 2026 को मुंबई में सानिया चंडोक से शादी करेंगे। शादी से पहले के उत्सव 3 मार्च से शुरू होंगे। सचिन तेंदुलकर ने सगाई की पुष्टि की, निजी कार्यक्रम में करीबी दोस्त और परिवार शामिल होंगे। सानिया पेट केयर व्यवसाय में एक उद्यमी हैं।