Join us

सचिन तेंडुलकरने ठेवलं हार्दिक पंड्याला हे खास नाव, तुम्हाला ते माहितेय का...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-20 सामना सुरु असताना सचिन काही ट्विट करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 19:49 IST

Open in App
ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 लढतीत भारताच्या गोलंदाजांनी आणि खासकरून पंड्याने चांगले पुनरागमन केले. त्यावेळी सचिनने एक ट्विट केले.

मुंबई : भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर हा सध्या खेळत नसला तरी चर्चेत मात्र नक्कीच आहे. सचिन कधी आपल्या ट्विट्समुळे चर्चेत असतो तर कधी आपल्या मार्गदर्शनामुळे. पण सध्याच्या घडीला सचिन फार वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे. सचिनने सध्या हार्दिक पंड्याला खास नाव ठेवलं आहे आणि त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-20 सामना सुरु असताना सचिन काही ट्विट करत होता. पहिल्यांदा त्याने ' इंग्लंड प्रथम फलंदाजी करताना 225 धावा करेल,' असे म्हटले होते. पण काही वेळात भारताच्या गोलंदाजांनी आणि खासकरून पंड्याने चांगले पुनरागमन केले. त्यावेळी सचिनने एक ट्विट केले. त्यावेळी सचिनने हार्दिकला ' कुंग फू पंड्या ' असे नवीन नाव दिले आहे.

सचिनने काय ट्विट केले ते पाहा

टॅग्स :सचिन तेंडूलकरहार्दिक पांड्याइंग्लंड विरुद्ध भारतटी-20 क्रिकेट