"जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला घरी घेऊन येतो..."; Arjun Tendulkar बद्दल सचिनचा भावनिक VIDEO

Sachin Tendulkar emotional Arjun Tendulkar Marriage: अंबानी कुटुंबाने अर्जुन-सानियासाठी होस्ट केला छोटेखानी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 19:27 IST2026-02-25T19:24:26+5:302026-02-25T19:27:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
sachin tendulkar gets emotional while speaking about son arjun tendulkar marriage with saaniya chandhok | "जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला घरी घेऊन येतो..."; Arjun Tendulkar बद्दल सचिनचा भावनिक VIDEO

"जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला घरी घेऊन येतो..."; Arjun Tendulkar बद्दल सचिनचा भावनिक VIDEO

Sachin Tendulkar emotional Arjun Tendulkar Marriage: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरीलग्नाची लगबग सुरु आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर ५ मार्च २०२६ रोजी विवाहबद्ध होणार आहे. प्रसिद्ध व्यावसायिक रवी घई यांची नात असलेल्या सानिया चांडोक (Saaniya Chandhok) हिच्यासोबत तो लग्नगाठ बांधणार आहे. या शाही विवाह सोहळ्याचे निमंत्रण तेंडुलकर कुटुंबाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत सर्वांनी दिले आहे. मार्चमध्ये हा विवाहसोहळा होण्याआधी काही दिवसांपूर्वी जामनगरमध्ये अर्जुन सानिया यांचा एक छोटेखानी सोहळा झाला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा झालेल्या ठिकाणीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने ट्विट केला असून, यात सचिन आपल्या लेकाबाबत भावनिक होताना दिसत आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा

सचिन लेकाबद्दल काय म्हणाला?

"नीता भाभी आणि मुकेश भाई, या नव्या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी यापेक्षा जास्त चांगली जागा आणि योग्य मंडळी दुसरी कुठलीही असूच शकली नसती. आमचे इतके चांगले आदरातिथ्य केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. जेव्हा मुलगा एखाद्या मुलीला घरी घेऊन येतो, तिची कुटुंबाशी ओळख करून देतो, तेव्हा तुम्हाला समजतं की मुलगा मोठा झाला आहे. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. अर्जुन, तुझ्या निवडीबाबत मला तुझा अभिमान वाटतो. तुला तुझ्या आयुष्यात अशी खास व्यक्ती मिळाली आहे जी तुझ्यावर तितकं प्रेम करते जेवढं तु तिच्यावर प्रेम करतोस. तुम्हाला अनेक आशीर्वाद," अशा शब्दांत सचिन आपल्या लेकाबद्दल बोलताना भावनिक झाल्याचे दिसतो.

अर्जुन-सानियाचे लग्न कधी आणि कुठे?

एका वृत्तानुसार, अर्जुन आणि सानिया यांचा विवाहसोहळा ५ मार्च २०२६ रोजी पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे विधी आणि मुख्य समारंभ ३ मार्चपासून सुरू होतील. हे सर्व कार्यक्रम प्रामुख्याने मुंबईत आयोजित केले जाणार आहेत. तेंडुलकर कुटुंबाने हा सोहळा खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि क्रिकेट विश्वातील काही मोजकेच दिग्गज उपस्थित असतील.

Web Title : सचिन तेंदुलकर का भावुक वीडियो: जब अर्जुन एक लड़की को घर लाया...

Web Summary : सचिन तेंदुलकर के बेटे अर्जुन 5 मार्च, 2026 को सानिया चांदोक से शादी करेंगे। जामनगर में प्री-वेडिंग सेलिब्रेशन हुआ। सचिन ने खुशी व्यक्त करते हुए सानिया का परिवार में स्वागत किया और जोड़े के भविष्य के लिए आशीर्वाद दिया।

Web Title : Sachin Tendulkar's emotional video: When Arjun brought a girl home...

Web Summary : Sachin Tendulkar's son, Arjun, will marry Saaniya Chandhok on March 5, 2026. A pre-wedding celebration was held in Jamnagar. Sachin expressed his happiness and pride, welcoming Saaniya into the family and blessing the couple's future.