Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर

युवीच्या चॅलेंजला सचिनचं मजेशीर उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:17 IST2020-06-01T13:16:15+5:302020-06-01T13:17:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Sachin Tendulkar Asks Yuvraj Singh "Paranthe Kithe Hai?" In Reply To 'Keep it Up' Challenge svg | Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर

Video : युवराज सिंगच्या 'किचन 100' चॅलेंजला सचिन तेंडुलकरचं दमदार उत्तर

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं नुकतंच युवराज सिंगनं दिलेलं चॅलेंज पूर्ण केलं होतं. सचिननं डोळ्यावर पट्टी घालून ते पूर्ण केलं आणि युवीनं त्याची माफी मागितली. पण, आता युवीनं भारताच्या माजी फलंदाजासाठी किचन 100 चॅलेंज दिलं आहे. युवीनं इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला त्यात तो लाटणं हातात घेऊन चेंडू टोलवताना दिसत आहे. त्यानं सचिनला हे चॅलेंज पूर्ण करण्यास सांगितलं आहे.

त्यानं लिहिलं की,''मास्टर ब्लास्टर तू क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम मोडले आहेस..पण, आता मी तुला एक चॅलेंज देत आहे. क्षमा कर मी पूर्ण व्हिडीओ अपलोड करत नाही, कारण तुला 100 अंक मोजण्यासाठी वेळ लागेल. आशा करतो की हे चॅलेंज पूर्ण करताना तू स्वयंपाक घरातील काही वस्तू मोडणार नाहीस.''


आता सचिन तेंडुलकर हे चॅलेंज कसं पूर्ण करतो याची उत्सुकता आहे. यापूर्वी सचिननं युवीची बोलती बंद केली होती. सचिननं डोळ्यावर पट्टी बांधून ते चॅलेंज पूर्ण केलं होतं.  
 

सचिननं विचारलं...

WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन 

नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल 

हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!

विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज

Web Title: Sachin Tendulkar Asks Yuvraj Singh "Paranthe Kithe Hai?" In Reply To 'Keep it Up' Challenge svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.