नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्यानं इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी दिली.

हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता.

त्यानंतर हे कपल सोबतच आहेत. लॉकडाऊनमुळे नताशा ही पांड्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे.

रविवारी हार्दिकनं नताशासोबतचा फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. मुंबई इंडियन्सनं त्यांचं अभिनंदन केलं.

कुटुंबीयांसोबत हार्दिकनं या गोड बातमीचा आनंद साजरा केला.

नताशाच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.