पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझमची दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात अगदीच खराब झालीये. पहिल्या टी-२० सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर साइट स्क्रिन सेट करण्यासाठी जवळपास १५ मिनिटे घालवल्यावर बाबर आझमला तेवढी मिनिटे मैदानात टिकताही आले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील १८ वर्षीय गोलंदाजाने १२ मिनिटांच्या आत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. एवढेच नाही तर ४ चेंडूचा सामना करून बाबर आझमला शून्यावर माघारी परतावे लागले.
IPL स्टारची रॉयल कामगिरी; बाबरच्या पदरी पडला 'भोपळा'
दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून खेळणारा क्वेना माफाका हा IPL मध्ये खेळताना दिसला आहे. युवा गोलंदाजानं गत हंगामात मुंबई इंडियन्सकडून IPL मध्ये पदार्पणाचा सामना खेळला होता. मुंबई इंडियन्सनं रिलीज केल्यावर IPL मेगा लिलावात या गोलंदाजावर राजस्थान रॉयल संघानं १ कोटी ५० लाखाचा डाव खेळल्याचे पाहायला मिळाले होते. 'रॉयल' गोलंदाजासमोर अनुभवी बाबर आझम खातेही उघडू शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानच्या बब्बर शेरला ट्रोलही करण्यात येत आहे.
रोहित-विराटचा विक्रम मोडायला आला अन् शून्यावर बाद झाला
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी त्याच्याकडे आहे. पण त्याचा फ्लॉप शो कायम राहिल्यामुळे भारतीय दिग्गजांचा विक्रम अबाधितच राहिला आहे. वर्ल्ड रेकॉर्डची नामी संधी डोळ्यासमोर असताना बाबर आझमवर शून्यावर बाद होण्याची नामुष्की ओढावल्याचे पाहायला मिळाले.
IPL टॅलेंटसमोर पाक ब्रँड शून्य
दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना मिलरच्या ४० चेंडूतील किलर खेळीच्या जोरावर निर्धारित २० षटकात १८३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी बाबर आझमनं कॅप्टन मोहम्मद रिझवानच्या साथीनं डावाला सुरुवात केली. पण नुसती हजेरी लावून तो माघारी फिरला. युवा गोलंदाजासमोर त्यानं सपशेल लोटांगण घातल्यामुळे सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात येत आहे. १५ मिनिटे साइड स्क्रीन सेट करण्यात घालवली, रन आउट होता होता वाचला अन् शून्यावर बाद होऊन परतला. अशी कमेंट्स करत एकाने बाबरची शाळा घेतलीये. आयपीएल टॅलेंटसमोर पाकिस्तानचा ब्रँड शून्य अशा काही प्रतिक्रियाही सोशल मीडयावर उमटल्याचे दिसून येते.