South Africa vs Canada, 9th Match, T20 World Cup 2026 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या 'ड' गटातील लढतीत गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कॅनडाच्या संघाला ५७ धावांनी पराभूत करत यंदाच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी सलामी दिली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ४ बाद २१३ धावा केल्या. ही यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या धावसंख्येचा पाठलाग करताना कॅनडाचा संघ निर्धारित २० षटकांत ८ बाद १५६ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मार्करमचा दमदार अर्धशतक, अखेरच्या षटकात किलर मिलरचीही फटकेबाजी
क्विंटन डिकॉकसोबत डावाची सुरुवात करताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करम याने या सामन्यात ३२ चेंडूत १० चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५९ धावांची खेळी केली. मार्करमशिवाय क्विंटन डि कॉकनं या सामन्यात २२ चेंडूत २५ धावा तर रायन रिकल्टन याने २१ चेंडूत ३३ धावांचे योगदान दिले. अखेरच्या षटकात २३ चेंडूत ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३९ धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सनं १९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा कुटल्या. गोलंदाजीत कॅनडाकडून अंश पटेल याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
पाकचा हा डावही फसला! ICC नं मागण्या फेटाळल्यावर भारतासोबत खेळण्यास 'राजी'; अधिकृत घोषणा बाकी
कॅनडाकडून भारतीय वंशाचा बॅटर चमकला, पण...
दक्षिण आफ्रिकेकडून सेट केलेल्या धावसंख्येच्या पाठलागा करताना कॅनडाच्या संघाकडून भारतीय वंशाच्या नवनीत धालीवाल याने तगडी फाईट दिली. त्याने ७ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावांची खेळी केली. दोन्ही संघाकडून त्याची ही खेळी सर्वोच्च ठरली. याशिवाय हर्ष ठाकर याने २९ चेंडूत केलेल्या ३३ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाचा निभाव लागला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून गोलंदाजी लुंगी एनिगडीनं कहर केला. ४ षटकात ३१ धावा खर्च करत त्याने ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर तो सामनावीरही ठरला. याशिवाय मार्को यान्सेन याने २ तर कगिसो रबाडा आणि कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.