Sreesanth Retirement: वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतचा स्थानिक क्रिकेटला अलविदा; म्हणाला, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला

S Sreesanth Retirement : सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीसंत मेघालयविरुद्ध खेळताना दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 2 बळी घेतले. मात्र, दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळाला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:00 PM2022-03-09T21:00:50+5:302022-03-09T21:02:20+5:30

whatsapp join usJoin us
S Sreesanth Retirement sreesanth announces retirement fmom first class cricket career | Sreesanth Retirement: वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतचा स्थानिक क्रिकेटला अलविदा; म्हणाला, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला

Sreesanth Retirement: वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतचा स्थानिक क्रिकेटला अलविदा; म्हणाला, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतने (S Sreesanth) बुधवारी सर्व प्रकारच्या स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. श्रीसंत नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये केरळकडून खेळताना दिसला होता. या सत्रातील रणजी ट्रॉफीच्या लीग राउंडनंतर श्रीसंतने निवृत्तीची घोषणा केली. सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामात वेगवान गोलंदाज श्रीसंत मेघालयविरुद्ध खेळताना दिसला होता. मेघालयविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने 2 बळी घेतले. मात्र, दुसऱ्या डावात त्याला एकही बळी मिळाला नाही. महत्वाचे म्हणजे श्रीसंतची कारकिर्द वादांनीही भरलेला होती.

निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंतने ट्विट केले की, 'पुढच्या पीढीतील क्रिकेटर्ससाठी.. मी आपली प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्द थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्या एकट्याचा आहे, आणि खरेतर मला माहीत आहे की, यामुळे मला आनंद मिळणार नाही, मात्र माझ्या आयुष्यात हा निर्णय यावेळी घेणे योग्य आणि सन्मानाचे आहे. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.'



भारतासाठी 27 कसोटी सामने खेळलेला श्रीसंत 2007 साली T20 विश्वचषक विजेत्या संघाचा आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य राहिला आहे. श्रीसंतने मिस्बाह-उल-हकचा झेल घेत भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून दिला होता.

39 वर्षीय श्रीसंतने भारतीय संघासाठी 27 कसोटी, 53 एकदिवसीय आणि 10 टी-20 सामने खेळले आहेत. याशिवाय श्रीसंतच्या नावावर 74 फर्स्ट क्लास सामने आहेत, या 74 सामन्यांमध्ये श्रीसंतने 213 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 87 विकेट आहेत. श्रीसंतने क्रिकेटशिवाय टीव्ही रिअॅलिटी शो, तसेच हिंदी, मल्याळम, कन्नड भाषांमध्ये एकूण 4 चित्रपटही केले आहेत.
 

Web Title: S Sreesanth Retirement sreesanth announces retirement fmom first class cricket career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.