१५ वर्षीय 'छोरी'ची कमाल! T20I पदार्पणात वादळी शतक अन् एका डावात दोन विश्वविक्रमांसह रचला इतिहास

असा पराक्रम करुन दाखवणारी ठरली पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:43 IST2026-03-21T14:39:50+5:302026-03-21T14:43:59+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Rwanda Batter Fanny Utagushimaninde Scripts History With Womens T20I Century On Debut First woman to score a hundred on T20I debut | १५ वर्षीय 'छोरी'ची कमाल! T20I पदार्पणात वादळी शतक अन् एका डावात दोन विश्वविक्रमांसह रचला इतिहास

१५ वर्षीय 'छोरी'ची कमाल! T20I पदार्पणात वादळी शतक अन् एका डावात दोन विश्वविक्रमांसह रचला इतिहास

क्रिकेटच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यात अनेकदा जुने विक्रम मोडीत निघून नवे विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये शुक्रवारी अवघ्या १५ वर्षांच्या बॅटरनं पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार कामगिरीसह क्रिकेट जगताचे लक्षवेधून घेतलं आहे. रवांडा महिला क्रिकेट संघाकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या फॅनी उतागुशिमानिंदे (Fanny Utagushimaninde) पहिल्या टी-२० सामन्यात वादळी शतकासह दोन खास विश्वविक्रमाला गवसणी घातली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

एका डावात दोन विश्वविक्रम

नायजेरियातील ताफावा बालेवा स्क्वेअर क्रिकेट ओव्हल येथे रंगलेल्या नायजेरिया इनव्हिटेशनल महिला T20 स्पर्धेत घाना विरुद्धच्या सामन्यात फॅनीने ६५ चेंडूत १७ चौकारांच्या मदतीने १११ धावांची खेळी साकारली. या खेळीसह आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावण्यासह आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही आता या रवांडाच्या छोरीच्या नावे झाला आहे. 

"मी दोघींसोबत असताना..." हे काय बोलून गेला Dwayne Bravo? कर्णधार अजिंक्य रहाणेनं रोखलं, पण...

छोटा पॅक बडा धमाका!

आंतरराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमध्ये याआधी प्रोस्कोव्हिया अलाको हिच्या नावे सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रम होता. २०१९ मध्ये तिने मालीविरुद्ध १६ वर्षे २३३ दिवस वय असताना ११६ धावांची खेळी साकारली होती. आता फॅनीने १५ वर्षे आणि २२३ दिवस वय असताना शतकी खेळी करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. पुरुष टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतकाचा विक्रम Gustav McKeon याच्या नावावर आहे. त्याने २०२२ मध्ये स्वित्झर्लंडविरुद्ध १८ वर्षे आणि २८० दिवसांच्या वयात शतक झळकावले होते.

असा पराक्रम करुन दाखवणारी ठरली पहिली

 फॅनी उतागुशिमानिंदे ही महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण सामन्यातच शतक करणारी पहिली खेळाडू ठरली आहे.  याआधी हा विक्रम पदार्पण सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रमही तिने मोडला.  याआधी ऑस्ट्रेलिन माजी महिला क्रिकेटर करेन लुईस रोल्टन हिने पदार्पणाच्या सामन्यात नाबाद ९६ धावा केल्याचा रेकॉर्ड होता. हा विक्रम फॅनीने मोडीत काढला आहे.

फॅनीच्या विक्रमी शतकाच्या जोरावर रवांडाच्या संगाने निर्धारित २० षटकात ३ विकेट्सच्या मोबदल्यात २१० धावा करत घाना संघासमोर २११ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना घाना संघ निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात ८८ धावांवर्यंतच मजल मारू शकला. रवांडाच्या संघाने १२२ धावांनी विजय नोंदवला
 

Web Title : 15 वर्षीय खिलाड़ी का धमाका: डेब्यू T20I में शतक, दो वर्ल्ड रिकॉर्ड!

Web Summary : रवांडा की 15 वर्षीय फैनी उतागुशिमानिंडे ने घाना के खिलाफ टी20I डेब्यू में शानदार शतक बनाकर क्रिकेट जगत को चौंका दिया। 111 रनों की उनकी पारी ने दो विश्व रिकॉर्ड तोड़े: टी20I शतक बनाने वाली सबसे कम उम्र की खिलाड़ी और डेब्यू पर शतक बनाने वाली पहली खिलाड़ी, जिससे रवांडा को निर्णायक जीत मिली।

Web Title : 15-year-old's debut T20I century shatters records, sets new milestones.

Web Summary : Fifteen-year-old Fanny Utagushimaninde of Rwanda stunned the cricket world with a blazing century on her T20I debut against Ghana. Her remarkable innings of 111 runs broke two world records: youngest player to score a T20I century and first to score a century on debut, leading Rwanda to a decisive victory.