भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर अन् चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा सध्या महाराष्ट्र संघाकडून बुची बाबू स्पर्धेच्या निमित्ताने चेन्नई दौऱ्यावर आहे. छत्तीसगड विरुद्धच्या सामन्यानंतर मराठमोळ्या क्रिकेटरनं चेन्नई सुपर किंग्जच्या अकादमीतील बच्चे कंपनीची भेट घेतली. क्रिकेटचं धडे घेणाऱ्या मुलांसोबत त्याने गंमतीशीर अंदाजात संवाद साधला. यावेळी त्याला आपल्या संघाच्या अकादमीत काही मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे चाहतेही दिसले. यावर ऋतुराजची रिअॅक्शन बघण्याजोगी होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तुमची नावे सांगा लक्षात ठेवीन, असं का म्हणाला ऋतुराज?
चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून ऋतुराज गायकवाड आणि अकादमीतील बच्चे कंपनीचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये गप्पा गोष्टीला सुरुवात करताना ऋतुराज गायकवाड मुलांना आयपीएलमधील कोणत्या संघाला पाठिंबा दर्शवता असा प्रश्न विचारताना दिसते. त्याच्या भोवती जमलेल्या गर्दीतून CSK च्या नावासह RCB आणि मुंबई इंडियन्सचे नाव घेणारे चाहतेही त्याला दिसून आले. यावर ऋतुराज म्हणतो की, CSK सोडून अन्य संघाला सपोर्ट करणारे हात वर करा असे म्हणतो. दुसऱ्या फ्रँचायझीला सपोर्ट करणाऱ्यांनी आपली नावे सांगा मी ती लिहून घेऊन लक्षात ठेववतो. तुम्हाला चेन्नई संघात कधीच घेणार नाही, असे तो त्या मुलांना मजेशीर अंदाजात म्हणताना दिसते.
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
खराब कामगिरी करणाऱ्याची सर्वांसमोर शाळा घेतो
धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ऋतुराज गायकवाडकडे संघाचे नेतृत्व दिले आहे. यंदाच्या हंगामात दुखापतीमुळे त्याने आयपीएलमधून माघार घेतली. तो CSK चा स्टार आहे. पण एका चिमुकल्याने क्रिकेटरनं त्याला CSK कडून खेळतोस का? असा प्रश्न विचारला. यावर ऋतुराजनं मी TSK कडून खेळतो, असा रिप्लाय दिला. यावेळी त्याला मुलांनी अनेक प्रश्न विचारले. एकाने तर जर संघातील खेळाडू चांगला खेळला नाही तर त्यांच्यावर ओरतोस का? त्यांच्यावरील राग मैदानातच निघतो का ड्रेसिंग रुममध्ये असा प्रश्नही ऋतुराजला विचारण्यात आला होता. सगळ्यांच्या समोरच मी त्याला थोबडीत मारतो, असे गंमतीशीर उत्तर CSK स्टारनं दिल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: Ruturaj Gaikwad’s Funny Banter with Super Kings Academy Academy Kids for Supporting MI And RCB Teams Video Goes Viral
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.