Join us

T20WC सुरू असताना ऋतुराज गायकवाडचा Video Viral; अचंबित करणारं घडलं काहीतरी

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना ऋतुराजने १४ सामन्यांत ५३ च्या सरसरीने ५८३ धावा केल्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 21:12 IST

Open in App

भारतीय संघ सध्या अमेरिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा खेळतोय आणि त्यांनी पहिल्या सामन्यात आयर्लंडवर मात करून मोहिमेची यशस्वी सुरुवातही केली आहे. ९ जूनला भारतासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान असेल...पण, सध्या सोशल मीडियावर ऋतुराज गायकवाडची ( Ruturaj Gaikwad ) चर्चा सुरू आहे. ऋतुराजची वर्ल्ड कप स्पर्धेची बस चुकली असली तरी तो सध्या महाराष्ट्र प्रीमिअर लीगमध्ये पुणेरी बाप्पा संघाकडून खेळतोय. MPL मध्ये रत्नागिरी जेट्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराजच्या बाद होण्याची चर्चा सुरू आहे.

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना ऋतुराजने १४ सामन्यांत ५३ च्या सरसरीने ५८३ धावा केल्या. त्यात १ शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीनंतर ( ७४१ ) आयपीएल २०२४ मध्ये ऋतुराजने सर्वाधिक धावा केल्या आहेत. तरीही त्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियात संधी मिळालेली नाही. पुणेरी बाप्पा आणि रत्नागिरी जेट्स यांच्यात आज सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करताना पुणेरी बाप्पाचा संघ १९.५ षटकांत १४४ धावांवर ऑल आऊट झाला. पवन शाह ( ३२), यश क्षीरसागर ( २४), कर्णधार ऋतुराज ( २९) व सचिन भोसले ( २२) यांनी चांगला खेळ केला.

१२व्या षटकात ऋतुराज दोन धाव घेण्याच्या प्रयत्नात विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. ऋतुराज क्रिजमध्ये योग्यवेळी पोहोचला होता, परंतु त्याच्या हातून बॅट निसटली आणि यष्टिरक्षकाने बेल्स उडवल्या. ऋतुच्या हातात बॅट नसल्याने त्याला रनआऊट दिले गेले. 

टॅग्स :ऋतुराज गायकवाडटी-20 क्रिकेट