Duleep Trophy 2025 Ruturaj Gaikwad Century Semi Final : दुलीप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल लढतीत पश्चिम विभागाकडून खेळणाऱ्या ऋतुराड गायकवाडने दमदार शतक साजरे केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे आठवे शतक ठरले. बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड बी येथे सुरु असलेल्या मध्य विभाग संघाविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १० धावांवर २ विकेट्स पडल्यावर ऋतुराज गायकवाडनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी BCCI निवडकर्त्यांचं लक्षवेधून घेणारी खेळी
एका बाजूला कसोटी संघातील कायमचा सदस्य असलेला यशस्वी जैस्वाल अन् टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असलेला श्रेयस अय्यर हे अपयशी ठरले असताना दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाडनं आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये. घरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी पश्चिम विभागाला मोठ्या संकटातून सावरताना शतकी खेळी करत ऋतुराजनं BCCI निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले आहे. या खेळीच्या जोरावर त्याला टीम इंडियात संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.