Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

संघ अडचणीत असताना शतकी खेळी करत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 15:17 IST2025-09-04T15:06:18+5:302025-09-04T15:17:15+5:30

whatsapp join usJoin us
Ruturaj Gaikwad Smashes Century During Duleep Trophy 2025 Semifinal Against Central Zone Joins The Race For Test Call Up | Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Duleep Trophy 2025 Ruturaj Gaikwad Century  Semi Final :  दुलीप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल लढतीत पश्चिम विभागाकडून खेळणाऱ्या ऋतुराड गायकवाडने दमदार शतक साजरे केले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे आठवे शतक ठरले. बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंड बी येथे सुरु असलेल्या मध्य विभाग संघाविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १० धावांवर २ विकेट्स पडल्यावर ऋतुराज गायकवाडनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी  BCCI निवडकर्त्यांचं लक्षवेधून घेणारी खेळी 

एका बाजूला  कसोटी संघातील कायमचा सदस्य असलेला यशस्वी जैस्वाल अन् टीम इंडियात कमबॅकसाठी तयार असलेला श्रेयस अय्यर हे अपयशी ठरले असताना दुसऱ्या बाजूला ऋतुराज गायकवाडनं आपल्यातील क्षमता दाखवून दिलीये.  घरच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी पश्चिम विभागाला मोठ्या संकटातून सावरताना शतकी खेळी करत ऋतुराजनं BCCI निवडकर्त्यांचे लक्षवेधून घेतले आहे. या खेळीच्या जोरावर त्याला टीम इंडियात संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

अय्यरसह या गड्यांसोबत उपयुक्त भागीदारीसह सावरला संघाचा डाव
 
ऋतुराज  गायकवाडने १३१ चेंडूत १३ चौकारांसह  आठवे प्रथम श्रेणी शतक झळकावताना  श्रेयस अय्यरसह आर्यासोबतच्या उपयुक्त भागीदारीसह संघाला अडचणीतून बाहेर काढले. यशस्वी जैस्वाल आणि हार्विक देसाई दोन्ही सलामीवीर तंबूत परतले त्यावेळी संघाच्या धावफलकावर फक्त  १० धावा लागल्या होत्या. ऋतुराज गायकवाडनं आर्य देसाईच्या साथीनं आधी तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर श्रेयस अय्यरसोबत पाचव्या विकेटसाठी त्याने ४५ तर शम्स मुलानीसोबत सहाव्या विकेटसाठी  ४२ धावांची उपयुक्त भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.  त्याच्या या खेळीच्या जोरावर पश्चिम विभाग संघ फायनल गाठणार का? वेस्ट इंडिज विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत त्याच्यासाठी टीम इंडियाचा दरवाजा उघडणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

 

Web Title: Ruturaj Gaikwad Smashes Century During Duleep Trophy 2025 Semifinal Against Central Zone Joins The Race For Test Call Up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.