Ruturaj Gaikwad Pulls Out Of County Championship : भारताचा युवा स्टार बॅटर ऋतुराज गायकवाड अनेक दिवसांपासून टीम इंडियाबाहेर आहे. तो IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसला होता. पण दुखापतीमुळे त्याच्यावर या स्पर्धेतून माघार घेण्याची वेळ आली होती. टीम इंडियात पुन्हा स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या मराठमोळा क्रिकेटर भारत 'अ' संघासोबत इंग्लंड दौऱ्यावरही गेला. पण या संघातही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही संधी मिळाली नाही. त्यानंतर ऋतुराज गायकवाडनं इंग्लंड काउंटी क्रिकेटमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याने आता या स्पर्धेतूनही माघार घेतली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वैयक्तिक कारण देत इंग्लंडला जाण्यास दिला नकार
ऋतुराज गायकवाडनं इंग्लंडमधील काउंटी क्लबच्या यॉर्कशायर संघासोबत ५ सामन्यासाठी करार केल्यावर २२ जुलैला तो काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार होता. पण वैयक्तिक कारण देत आयत्या वेळी त्याने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतीय क्रिकेटच्या या निर्णयामुळे यॉर्कशायर संघाला मोठा धक्का बसला आहे.
मिताली ते स्मृती! जाणून घ्या वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय 'रन'रागिणींचा खास रेकॉर्ड
त्याचा रिप्लेसमेंट शोधणं कठीण
यॉर्कशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक अँथनी मॅकग्राथ यांनी ऋतुराज गायकवाडचा रिप्लेमेंट शोधणं कठीण असल्याचे म्हटले आहे. त्याची रिप्लेसमेंट शोधण्यासाठी संघाकडे फारच कमी वेळ आमच्याकडे आहे, असा उल्लेखही त्यांनी केलाय. एवढेच नाहीतर नेमकं कोणत्या कारणास्तव क्रिकेटनं हा निर्णय घेतला ते माहिती नसले तरी सर्वकाही ठिक होईल, असे म्हणत अँथनी मॅकग्राथ यांनी भारतीय क्रिकेटरच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
ऋतुराज गायकवाडची कामगिरी
ऋतुराज गायकवाड याने ३८ प्रथम श्रेणी सामन्यात ४१.७७ च्या सरासरीसह २६३२ धावा केल्या आहेत. यात ७ शतकांचा समावेश आहे. भारतीय संघाकडून त्याने २३ टी २० आणि ६ वनडे सामने खेळले आहेत. पण अद्याप त्याला कसोटी संघात स्थान मिळवता आलेले नाही.