RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला!

टॉम कुरननं ( Top Curran) ने अर्धशतकी खेळी करून RRसाठी एकाकी खिंड लढवली. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 30, 2020 11:23 PM2020-09-30T23:23:09+5:302020-09-30T23:29:43+5:30

whatsapp join usJoin us
RR vs KKR Latest News : Kolkata Knight Riders won by 37 runs against Rajasthan Royals | RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला!

RR vs KKR Latest News : कोलकाताच्या यंग ब्रिगेडनं राजस्थानचा विजयरथ रोखला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League ( IPL 2020) आज कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) यांच्यात KKR ने बाजी मारली. शुबमन गिल ( Shubman Gill), इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांच्या दमदार कामगिरीनंतर KKRच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना RRचा विजयरथ अडवला. शिवम मावी ( Shivam Mavi) आणि कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) या युवा गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मावी, नागरकोटी आणि वरुण चक्रवर्थी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

उभय संघ पहिल्यांदाच दुबईच्या स्टेडियमवर खेळत असल्यानं येथील खेळपट्टीचा दोघांनाही अंदाज नाही. KKRनं आज आंद्रे रसेलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा डाव खेळला. पण, त्याला अपयश आलं.  जोफ्रा आर्चरनं ( Jofra Archer) टिच्चून मारा करताना KKRच्या धावगतीला वेसण घातलं. मात्र, शुबमन गिल ( Shubman Gill) आणि इयॉन मॉर्गन ( Eoin Morgan) यांनी फटकेबाजी करून KKR संघाला 174 धावांपर्यंत मजल मारून दिली. शुबमननं 34 चेंडूंत 47 धावा केल्या. नितिश राणाने 17 चेंडूंत 22 धावा केल्या. 

आंद्रे रसेलला ( Andre Russell) फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देणं KKRसाठी फलदायी ठरलं नाही. त्याला 14 चेंडूंत 24 धावा करता आल्या. त्यानंतर इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांनी फटकेबाजी केली. KKR ला 20 षटकांत 6 बाद 174 धावा करता आल्या. मॉर्गननं अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी केली. त्यानं 23 चेंडूंत नाबाद 34 धावा केल्या. 

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला ( RR) 30 धावांत दोन धक्के बसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( 3) आणि संजू सॅमसन ( 8) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व शिवम मावी यांनी माघारी पाठवले. जोस बटलर आज फॉर्मात वाटत होता. त्यानं दोन खणखणीत षटकारही खेचले, परंतु सातव्या षटकात शिवम मावीनं त्याला चतुराईनं बाद केलं.  

रॉबीन उथप्पाला मोठी खेळी करण्याची संधी होती. पण, तो 2 धावांवर माघारी परतला. रियान पगाही त्याच षटकात कमलेश नागरकोटी ( Kamlesh Nagarkoti) च्या गोलंदाजीवर बाद झाला. शुबमन गिलनं पॉईंटवर सुरेख झेल टिपला. मागील सामन्याचा हिरो राहुल टेवाटिया ( Rahul Tewatia) 14 धावांवर माघारी परतला. त्यानंतर RRचे शेपूट गुंडाळण्यात KKR च्या गोलंदाजांना फार वेळ लागला नाही. RRने 9 बाद 137 धावा केल्या. KKRनं 37 धावांनी विजय मिळवला. टॉम कुरन 36 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 54 धावा केल्या. 

Web Title: RR vs KKR Latest News : Kolkata Knight Riders won by 37 runs against Rajasthan Royals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.