RR vs CSK Live Streaming IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी सर्वात यशश्वी संघ असलेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना खेळवण्यात येणार आहे. यंदाच्या हंगामाआधी या दोन संघातील मेगा ट्रेड चांगलाच चर्चेत राहिला होता. संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडून चेन्नईकडून मैदानात उतरणार असून CSK चा भिडू पुन्हा एकदा आपल्या आधीच्या राजस्थानच्या संघाकडून मैदानात उतरणार आहे. या स्टार खेळाडूंसह वैभव सूर्यवंशीच्या रुपात छोटा पॅक बडा धमाकाही पाहायला मिळणार आहे. इथं जाणून घेऊयात कधी अन् कुठं पाहता चेन्नई सुपर किंग्स अन् राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना? कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
गत हंगामात दोन्ही संघ तळाला राहिले, आता...
आयपीएलच्या नव्या हंगामात दोन्ही संघांनी चांगली संघ बांधणी केली आहे. राजस्थानचा संघ रियान परागच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. गत हंगामात राजस्थान रॉयल्सचा संघ नवव्या स्थानावर राहिला होता. राजस्थानकडून यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशीसह रवींद्र जडेजाच्या कामगिरीवर नजरा असतील. दुसऱ्या बाजूला CSK चा संघ धोनीशिवाय मैदानात उतरणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघातही मोठा बदल झाला आहे. संजू सॅमसनसह आयुष म्हात्रे, शिवम दुबेसह युवा खेळाडूंना या संघाकडून पदार्पणाची संधी मिळू शकते.
वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडलं! Angkrish Raghuvanshi चा मुंबई ते कोलकाता प्रवासाची प्रेरणादायी कहाणी
CSK vs RR यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड
- एकूण सामने: ३१
- CSK विजय: १६
- RR विजय: १५
राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, दसुन शानाका / डोनोवन फेरेरा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर
इम्पॅक्ट प्लेयर: विग्नेश पुथूर
चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, शिवम दुबे, सरफराज खान, प्रशांत वीर, जेमी ओव्हर्टन, नूर अहमद, मॅट हेन्री, खलील अहमद, अंशुल कांबोज
इम्पॅक्ट प्लेयर: राहुल चहर
RR vs CSK सामना कधी अन् कुठं रंगणार?
- सामन्याची तारीख: सोमवार, ३० मार्च, २०२६
- वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- सामन्याचे ठिकाण : बारसपारा स्टेडियम
भारतामध्ये कुठे पाहता सामना येईल?
- जिओहॉटस्टार ॲप /वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग
- स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेल्सवर थेट प्रसारण