CSK Deny RR’s Request Of Sanju Samson Trade : आयपीएलच्या आगामी हंगामा आधी संजू सॅमसनराजस्थान रॉयल्सची साथ सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. IPL मधील ट्रेड विंडोडच्या माध्यमातून काही फ्रँचायझींनी विकेट किपर बॅटरला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी फिल्डिंग लावलीये, असेही बोलले जात होते. यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ आघाडीवर होता. यासंदर्भात आता मोठी माहिती समोर येत आहे. चेन्नई सुपर किंग्ज संजू सॅमसनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी इच्छूक होते, पण राजस्थान रॉयल्स फ्रँचायजीची मागणी CSK ला पटलेली नाही. त्यामुळे त्यामुळे ही डील फिस्कटल्याचे समजते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चेन्नई सुपर किंग्जला हा सौदा वाटला घाट्याचा?
क्रिकबझच्या वृत्तानुसार, संजू सॅमसनच्या बदल्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने रवींद्र जडेजा किंवा ऋतुराज गायकवाडला आमच्यात द्या, अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर या दोघांशिवाय शिवम दुबेच्या नावाचाही यात समावेश होता. पण या तीन प्रमुख स्टार्सच्या बदल्यात संजू सॅमसनला ट्रेड करणं जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत, चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी संघाने हा सौदाच टाळला आहे. ऋतुराज गायकवाड हा तर CSK चा कॅप्टन आहे. त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे ही जोडीही संघाची ताकद आहे. त्यामुळे यापैकी एकाच्याही बदल्यात सौदा करणं चेन्नई सुपर किंग्जला घाट्याचं वाटल्याचे दिसते. अन् हा एक योग्य निर्णयही वाटतो.
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
अन्य फ्रँचायझीसोबतही झालीये चर्चा
संजू सॅमसनच्या ट्रेडसंदर्भात राजस्थान रॉयल्सच्या संघाने अन्य फ्रँचायझी संघासोबतही पत्र व्यवहार केला आहे. जर राजस्थान रॉयल्सच्या मनासारखं झालं अन् दुसऱ्या फ्रँचायझीलाही ते पटलं तर ट्रेडच्या माध्यमातून संजू सॅसमन पुढच्या हंगामात नव्या संघाकडून खेळताना दिसू शकते. पण जर ट्रेड डील खटकली तर मात्र तो राजस्थान रॉयल्सकडूनच खेळताना दिसेल, असाही दावा संबंधित वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
ट्रेड शिवाय हा अखेरचा पर्याय
चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने ट्रेड डील फिस्कटली असली तरी संजू सॅमसनला संघात घेण्यासाठी आणखी एक संधी उपलब्ध होऊ शकते. पण तेही राजस्थान रॉयल्सवरच अवलंबून असेल. याआधी समोर आलेल्या वृत्तानुसार, संजू सॅमसन याने स्वत: फ्रँचायझी संघाकडे ट्रेड किंवा रिलीज करण्यासंदर्भात विनंती केली होती. आगामी आयपीएल स्पर्धेआधी ट्रेड डील झाली नाही आणि मिनी लिलावाआधी राजस्थान रॉयल्सच्या संघाने संजूला रिलीज केले तर चेन्नईला त्याच्यावर डाव लावता येईल.