Join us

IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच

रोहित-विराटसाठी प्रत्येक वनडे सामना खेळण्याची संधी महत्त्वाची, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:58 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विराट कोहली या दोघांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेतील शेवटचा सामना गाजवला. रोहित शर्माच्या शतकाशिवाय किंग कोहलीनं नाबाद अर्धशतक झळकावले. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर ही जोडी फक्त वनडेतच खेळताना दिसणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित-विराटसाठी प्रत्येक वनडे सामना खेळण्याची संधी महत्त्वाची, पण...

२०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने अधिकाधिक क्रिकेट सामने खेळण्याची प्रत्येक संधी या जोडीसाठी महत्त्वपूर्ण असताना दोघेही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी ३ सामन्यांच्या मालिकेतून दूरच राहणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हिट शोमुळे या जोडीला वनडेतील आपली कारकिर्द टिकवण्यासाठी खूप टेन्शन घेण्याची गरज उरलेली नाही, हेच यातून दिसून येते.   इथं एक नजर टाकुयात कोणती आहे ती मालिका आणि ही जोडी पुन्हा कधी दिसेल मैदानात यासंदर्भातील सविस्तर माहिती

"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

 दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयनं भारतीय 'अ' संघाची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हिट शोनंतर रोहित विराटला या मालिकापासून दूर ठेवण्यात आल्याचे दिसते. बीसीसीआय निवडसमितीने या मालिकेसाठी नव्या चेहऱ्यांनाच संधी दिली आहे

दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ :

तिलक वर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उप कर्णधार), अभिषेक शर्मा, रियान पराग, ईशान किशन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, निशांत सिंधू, विप्रराज निगम, मानव सुथार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध्ध कृष्णा, खलील अहमद, प्रभसिमरन सिंगकधी रंगणार भारत 'अ' आणि दक्षिण आफ्रिका 'अ' यांच्यातील वनडे मालिका?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत 'अ' विरुद्ध दक्षिण आफ्रिका 'अ' संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येणार आहे. १३ नोव्हेंबरला दोन्ही संघात पहिला वनडे सामना खेळवण्यात येणार असून १६ नोव्हेंबरला दुसरा आणि १९ नोव्हेंबरला या मालिकेत शेवटचा सामना नियोजित आहे.  

रोहित-विराट थेट ३० नोव्हेंबरलाच मैदानात उतरणार 

रोहित शर्मा आणि विराट कोहली भारत 'अ' संघाकडून मैदानात उतरणार नसले तरी ही जोडी थेट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतून पुन्हा एकदा मैदानात धमाका करताना दिसेल. ३० नोव्हेंबरपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील या मालिकेला सुरुवात होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pant to comeback with captaincy; Rohit-Virat to miss SA 'A' series?

Web Summary : Rishabh Pant is set to return in the SA 'A' series. Rohit Sharma and Virat Kohli are likely to miss the series, focusing on the South Africa ODIs later in November.
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरोहित शर्मारिषभ पंतभारतीय क्रिकेट संघ