Join us

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SA: "गरजेच्या वेळी विराट अन् रोहित लगेच आऊट होतात"; वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं सडेतोड मत

वाचा, माजी कर्णधाराने आणखी काय मत व्यक्त केलं... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 15:37 IST

Open in App

Rohit Sharma Virat Kohli, IND vs SA: IPL 2022 संपल्यानंतर आता सर्वांच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेकडे लागल्या आहेत. पण या मालिकेत टीम इंडियाचे २ स्टार म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली खेळणार नसून केएल राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याचदरम्यान, भारताचे विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाच्या टॉप-3 बाबत मोठं विधान केलं आहे. "गरजेच्या वेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली नेहमी आऊट होतात", असं रोखठोक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

"टीम इंडियाच्या या तिन्ही खेळाडूंची विश्वासार्हता पणाला लागली आहे. तिघेही दबावाखाली खेळत आहेत. पण त्यांनी याबद्दलची चिंता न करता खेळायला हवं. तुम्हाला न घाबरता क्रिकेट खेळावे लागेल. कारण हे तीन खेळाडू असे आहेत जे १५०-१६० च्या स्ट्राइक रेटने धावा करू शकतात. फक्त एक विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा जेव्हा संघासाठी धावा करण्याची गरज असते, तेव्हा हे लोक झटपट बाद होतात. जेव्हा जेव्हा डावाला गती द्यावी लागते तेव्हा ते बाद होतात. त्यामुळे संघावर दबाव वाढतो. त्यामुळे तुम्ही एक तर स्ट्रायकरच्या भूमिकेत राहा  आणि धावगती वाढवा, किंवा मग अँकरच्या भूमिकेत राहा आणि शेवटपर्यंत खेळपट्टीला चिकटून राहा", असं सडेतोड मत कपिल देव यांनी व्यक्त केलं.

"केएल राहुलची संघातील भूमिका त्याला स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे.  जर संघाने त्यांना सांगितले की तुम्हाला २० षटके खेळायची आहेत आणि तुम्ही ६० धावा करून नाबाद आलात तरी चालेल, तर ते योग्य ठरणार नाही. तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. कारण असे झाले नाही तर तुम्ही तुमच्या खेळाडूचा नीट वापर करणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला खेळाडू बदलावे लागतील", असं कपिल देव म्हणाले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. IPL 2022 चा हंगाम दोघांसाठी चांगला गेला नाही. याशिवाय आगामी व्यस्त वेळापत्रकापूर्वी दोघांनाही विश्रांती देण्यात आली आहे. या दरम्यान केएल राहुल भारतीय संघाचे नेतृत्व करेल. राहुलने IPL 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले आणि तो फलंदाज म्हणून उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. लोकेश राहुलने या मोसमात ६०० हून अधिक धावा केल्या होत्या.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माविराट कोहलीकपिल देवलोकेश राहुल
Open in App