Rohit Sharma Training Session With Ayush Mhatre And Sarfaraz Khan : एका बाजूला टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेत खेळत असताना वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा फक्त वनडेच खेळताना दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रीय होईल. रोहित शर्मानं आगामी दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. मंगळवारी त्याने १९ वर्षांखाली टीम इंडियाचा कर्णधार आणि IPL मध्ये CSK च्या ताफ्यातून खेळताना दिसेलल्या आयुष म्हात्रेसह सरफराजसोबत सराव केला. नेट प्रॅक्टिस दरम्यान रोहित युवा क्रिकेटर्संनी टिप्स देतानाही दिसून आले. या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयुष म्हात्रेनं शेअर केली खास पोस्ट
आयुष म्हात्रे आणि सरफराज खान या दोन्ही युवा भारतीय फलंदाजांनी आपापल्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हिटमॅन रोहित शर्मासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. रोहितनं आयुष म्हात्रेला टिप्स तर दिल्याच. याशिवाय एक बॅटही गिफ्टच्या स्वरुपात दिली. आयुष म्हात्रेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून रोहितसोबतचा खास फोटो शेअर करताना लिहिलंय की, “ही फक्त एक भेट नाही, तर प्रेरणा आहे. धन्यवाद रोहित दा.”
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
हिटमॅनसोबतच्या नेट सेशनमध्ये सरफराज खानही दिसला
मुंबईकर सरफराज खान हा सध्या टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी कंबर कसतोय. तोही रोहित शर्मासोबत नेट्स प्रॅक्टिसमध्ये दिसला. सरफराजने इन्स्टास्टोरीच्या माध्यमातून रोहित शर्मासोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो रोहितकडून टिप्स घेताना दिसतोय. २७ वर्षीय सरफराज खान याने २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच कसोटीत पदार्पण केले होते. त्याच्या नावे एक शतक आणि तीन अर्धशतकांची नोंद आहे. तो पुन्हा एकदा संघात कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. घरच्या मैदानावरील वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संधी मिळणार का? ते पाहण्याजोगे असेल.