Join us

रोहित-लारासह संजू आणि श्रेयसचाही सन्मान! इथं पाहा CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार विजेत्यांची यादी

List of CEAT Cricket Rating Award Winners 2025 : इथं एक नजर टाकुयात यंदाच्या CEAT  क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात कोणत्या क्रिकेटरला कोणता पुरस्कार मिळाला यासंदर्भातील सविस्तर माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:27 IST

Open in App

List of CEAT Cricket Rating Award Winners 2025 : मुंबईत नुकताच २७ वा CEAT  क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात क्रिकेटच्या यंदाच्या वर्षात खास छाप सोडणाऱ्या क्रिकेटर्ससह क्रिकेच्या मैदानात खास योगदान देणाऱ्या दिग्गज क्रिकेटर्संना सन्मानित करण्यात आले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार  रोहित शर्मासह दिग्गज वेस्ट इंडिज  क्रिकेटर ब्रायन लारा यांना खास पुरस्काराने गौरवण्यात आले. इथं एक नजर टाकुयात यंदाच्या CEAT  क्रिकेट रेटिंग पुरस्कार सोहळ्यात कोणत्या क्रिकेटरला कोणता पुरस्कार मिळाला यासंदर्भातील सविस्तर माहिती.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रोहित शर्मासह लाराला खास पुरस्कार

भारतीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदाच्या पार्श्वभूीवर विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. रोहित शर्मानं लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्याकडून हा पुरस्कार स्विकारला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेआधी कॅप्टन्सी गमावल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात दिसला. वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटर ब्रायन लारा याला  लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. त्याचबरोबर, भारतीय फिरकी खेळाचे दिग्गज भगवथ चंद्रशेखर यांना वर्षाचा लाइफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार मिळाला.

वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट

CEAT क्रिकेट रेटिंग पुरस्कार विजेत्यांची यादी  (List of CEAT Cricket Rating Award Winners 2025)

  • चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील जेतेपदासाठी विशेष स्मृतीचिन्ह: रोहित शर्मा
  • लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड: ब्रायन लारा
  •  आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधील वर्षातील सर्वोत्मत क्रिकेटपटू: जो रूट
  • T20I मधील वर्षातील सर्वोत्तम फलंदाज: संजू सॅमसन
  • T20I मधील वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज: वरुण चक्रवर्ती
  • CEAT JioStar पुरस्कार: श्रेयस अय्यर
  • पुरुष गटातील ODI मधील वर्षाचा सर्वोत्तम फलंदाज: केन विल्यमसन
  • पुरुष ODI मधील वर्षातील सर्वोत्तम गोलंदाज: मॅट हेनरी
  • CEAT लाइफटाईम अचिव्हमेंट पुरस्कार: बी.एस. चंद्रशेखर
  • महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम बॅटर : स्मृती मंधाना
  • महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम बॉलर : दीप्ती शर्मा
  • उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार: अंगकृष रघुवंशी
  • सर्वोत्तम कर्णधारासाठी दिला जाणारा  पुरस्कार: टेंबा बावुमा
  • पुरुष क्रिकेटमधील टेस्टमधील बेस्ट गोलंदाज : प्रबाथ जयसुरिया
  • पुरुष क्रिकेटमधील कसोटीतील सर्वोत्तम खेळाडू : हॅरी ब्रुक
  • CEAT देशांतर्गत वर्षाचा क्रिकेटपटू: हर्ष दुबे 
English
हिंदी सारांश
Web Title : Rohit, Lara Honored at CEAT Cricket Rating Awards; Winners List

Web Summary : Rohit Sharma and Brian Lara were honored at the CEAT Cricket Rating Awards 2025. Joe Root, Sanju Samson, Shreyas Iyer, and other top performers also received awards for their outstanding contributions to cricket.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्मासंजू सॅमसनवरूण चक्रवर्ती