Join us  

IPL 2020तील महागड्या गोलंदाजाचा रोहित शर्मानं केला पालापाचोळा; पाहा कसे खणखणीत षटकार खेचले

रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले.

By स्वदेश घाणेकर | Published: September 24, 2020 8:00 AM

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्मानं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकारांसह 80 धावा केल्यामुंबई इंडियन्सच्या 5बाद 195 धावांचा पाठलाग करताना कोलकाताला 9 बाद 146 धावा करता आल्या

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) ने Indian Premier League ( IPL 2020) च्या सलामीच्या सामन्यातील CSKविरुद्धचा पराभव विसरून आज सांघिक खेळ केला. रोहित शर्माने ( Rohit Sharma) तर कोलकाता नाइट रायडर्सच्या ( KKR) गोलंदाजांना धु धु धुतले. रोहितनं IPL Auction 2020 मध्ये सर्वात महागडा ठरलेल्या गोलंदाजाचाही पालापाचोळा केला. KKRने 15.5 कोटींत आपल्या ताफ्यात घेतलेल्या पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात रोहितनं दोन खणखणीत षटकार खेचले. कमिनन्सने 3 षटकांत 49 धावा दिल्या.  (MI vs KKR Latest News & Live Score)

रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

Kolkata Knight Ridersने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले.  मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी 90 धावांची भागीदारी करताना MIच्या डावाला आकार दिला.  सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. रोहितनं 54 चेंडूंत 3 चौकार व 6 षटकार खेचून 80 धावा चोपल्या. MIला 20 षटकांत 5 बाद 195 धावा करता आल्या.  लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या KKRला मुंबईच्या गोलंदाजांनी इंगा दाखवला. जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी अचूक व भेदक मारा करताना KKRच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्याच दडपणात शुबमन गिल आणि सुनील नरीन यांनी विकेट्स फेकल्या. कर्णधार दिनेश कार्तिक आणि नितिश राणा यांनी KKRच्या डावाला आधार दिला.  मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या चतूर माऱ्यासमोर इयॉन मॉर्गन आणि आंद्रे रसेल या बिग हिटर फलंदाजांनाही फटके मारता येत नव्हते. पॅट कमिन्सनं 18व्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर चार षटकारांसह 27 धावा कुटल्या. कमिन्स 12 चेंडूंत 4 षटकारांसह 33 धावा करून माघारी परतला. KKRला 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.  या सामन्यात 80 धावा करणारा रोहित शर्मा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला. रोहितनं या सामन्यात सहा षटकार मारले.. 

रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम 

रोहित शर्मा आज सॉलिड खेळला; KKR विरुद्ध विक्रमांचा पाऊस पाडला

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :IPL 2020रोहित शर्मामुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स