MI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

MI vs KKR Latest News :रोहितनं या सामन्यात एक पराक्रम केला आणि MS Dhoniनंतर हा विक्रम नोंदवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. 

By स्वदेश घाणेकर | Published: September 23, 2020 08:53 PM2020-09-23T20:53:53+5:302020-09-23T20:54:38+5:30

whatsapp join usJoin us
MI vs KKR Latest News : Rohit Sharma becomes the second Indian after Dhoni to smash 200 Sixes in IPL history  | MI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

MI vs KKR Latest News : रोहित शर्माचा 'डबल' डोस; MS Dhoniनंतर IPLमध्ये नोंदवला भारी विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासून आघाडीवर होता. तगड्या फलंदाजांची फौज, सर्वोत्तम अष्टपैलू आणि भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांचा तोफखाना असलेला MI पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष त्यांच्या विजयाकडे लागले आहेत. रोहितनं या सामन्यात एक पराक्रम केला आणि MS Dhoniनंतर हा विक्रम नोंदवणारा तो दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. (MI vs KKR Latest News & Live Score)

रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  संघानेच जिंकला आहे.  या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला ( Kieron Pollard ) सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे.  (MI vs KKR Latest News & Live Score

मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. IPL 2020 Auctionमधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत Six मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या. (MI vs KKR Latest News & Live Score)

11व्या षटकात रोहित-सुर्या यांची 90 धावांची भागीदारी तुटली. सुर्यकुमार यादव 47 धावांवर धावबाद झाला. त्यानंतर रोहितनं सूत्र हाती घेताना 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमधील त्याचे हे 38वे अर्धशतक आहे. यासह त्यानं एबी डिव्हिलियर्सचा ( 37 अर्धशतक) विक्रम मोडला. सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत डेव्हिड वॉर्नर ( 48), विराट कोहली ( 41), सुरेश रैना ( 39) हे आघाडीवर आहेत. रोहितनं कुलदीप यादवच्या एकाच षटकात दोन षटकार खेचून IPLमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली. IPL मध्ये दोनशे षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला. ख्रिस गेल ( 326), एबी डिव्हिलियर्स ( 214) आणि महेंद्रसिंग धोनी ( 212) अव्वल तीन स्थानावर आहेत. सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांत तो 6व्या स्थानावर आहे. 


Web Title: MI vs KKR Latest News : Rohit Sharma becomes the second Indian after Dhoni to smash 200 Sixes in IPL history 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.