MI vs KKR Latest News : Rohit Sharma complet 850+ runs against KKR, Most runs against a team in IPL  | MI vs KKR Latest News : रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

MI vs KKR Latest News : रोहित शर्मानं मोडला David Warnerचा विक्रम; IPLमध्ये कुणालाच जमला नाही हा पराक्रम

MI vs KKR Latest News : गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) हा Indian Premier League ( IPL 2020) च्या जेतेपदाच्या शर्यतीत सुरूवातीपासून आघाडीवर होता. तगड्या फलंदाजांची फौज, सर्वोत्तम अष्टपैलू आणि भेदक मारा करणाऱ्या गोलंदाजांचा तोफखाना असलेला MI पहिल्याच सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) विरुद्धच्या आजच्या सामन्यात सर्वांचे लक्ष त्यांच्या विजयाकडे लागले आहेत. KKR विरुद्ध मागील पाच सामन्यातं MIने चार विजय मिळवले आहेत. (MI vs KKR Latest News & Live Score)

किरॉन पोलार्डला सामन्यापूर्वी MIने दिली भेट; त्याने तसा विक्रमच नोंदवलाय

Video, रोहित शर्मा अन् शॉर्ट बॉल, सुंदर Love Story; इरफान पठाणचं ट्विट व्हायरल

कोलकाता नाइट रायडर्सने ( KKR) नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला ( MI) प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलग पाचव्या सामन्यात नाणेफेक जिंकणाऱ्या संघाचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय. मात्र आधीच्या चार सामन्यांपैकी तीन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या  संघानेच जिंकला आहे.  या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला ( Kieron Pollard ) सामन्यापूर्वी 150 क्रमांकाची जर्सी देण्यात आली. मुंबई इंडियन्सकडून 150वा आयपीएल सामना खेळणारा पोलार्ड हा पहिलाच खेळाडू आहे. पोलार्डनं 150 IPL सामन्यांत 2773 धावा केल्या आहेत. त्यात 14 अर्धशतकांचा समावेश असून 83 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. शिवाय पोलार्डने 56 विकेट्सही घेतल्या आहेत. 


मुंबई इंडियन्सला दुसऱ्याच षटकात शिवम मावीनं धक्का दिला. क्विंटन डी'कॉक ( 1) धाव करून माघारी पतल्यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि सुर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांनी MIच्या डावाला आकार दिला. पॅट कमिन्सच्या चेंडूवर रोहितनं मारलेला षटकार लाजवाब होता. IPL 2020 Auctionमधील सर्वात महागडा गोलंदाज पॅट कमिन्सच्या षटकात रोहितनं दोन खणखणीत Six मारले. रोहित-सुर्यानं अर्धशतकी भागीदारी करताना संघाला पहिल्या पॉवर प्लेमध्ये 1 बाद 59 धावा करून दिल्या.

आयपीएलमध्ये रोहित शर्माने KKRविरुध्द 850+ धावा केल्या आहेत. एखाद्या फलंदाजाने आयपीएलच्या एकाच संघाविरुध्द केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.
 

प्रत्येक संघाविरुद्ध कुणी सर्वाधिक धावा केल्यात?
865* - रोहित शर्मा वि. कोलकाता नाइट रायडर्स
829 - डेव्हिड वॉर्नर वि.  कोलकाता नाइट रायडर्स
825 - विराट कोहली वि. दिल्ली कॅपिटल्स
819 - डेव्हिड वॉर्नर वि. किंग्स इलेव्हन पंजाब
818 - सुरेश रैना वि. कोलकाता नाइट रायडर्स
818- सुरेश रैना वि. मुंबई इंडियन्स
814- सुरेश रैना वि. किंग्स इलेव्हन पंजाब  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: MI vs KKR Latest News : Rohit Sharma complet 850+ runs against KKR, Most runs against a team in IPL 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.