Join us

Rohit Sharma New Look: नव्या लूकसह रोहित शर्मा करणार पुनरागमन, पत्नी रितिकानं दिली मजेशीर प्रतिक्रिया

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 21:22 IST

Open in App

भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. सध्या रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. या दरम्यान रोहितनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. रोहितनं त्याच्या लूकमध्ये बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. 

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या भरगच्च दाढी ठेवण्याचा ट्रेंड असताना रोहितनं त्याला फाटा देत आता क्लीन शेव्ह केलं आहे. रोहित शर्मा देखील नेहमी दाढी ठेवण्यास पसंती देत होता. पण आता रोहितनं क्लीन शेव्ह करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर नव्या लूकचा फोटो शेअर करत लहान मुलाचा इमोजी कॅप्शनमध्ये ठेवला आहे. नव्या लूकमध्ये आपण एखाद्या लहानमुलासारखे दिसत असल्याचं त्यानं इमोजीच्या माध्यमातन सुचवलं आहे. 

रोहित शर्माच्या नव्या लूकवर त्याची पत्नी रितिकानंही मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. "तू इतका अस्वस्थ का आहेस?", अशी कमेंट केली आहे. युवा गोलंदाज खलील अहमद यानंही रोहितच्या लूकवर कमेंट करत 'हा तर अंडर-१९ वाला लूक आहे', असं म्हटलं आहे. तसंच सूर्यकुमार यादव यानं रोहितच्या लूकचं कौतुक करत ''चकाचक'' अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Open in App