IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!

MI च्या संघाला फायनल गाठायची असेल तर रोहित शर्मालाही आपल्या भात्यातील धमक दाखवून द्यावी लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:11 IST2025-05-30T17:07:50+5:302025-05-30T17:11:52+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Performance In IPL Playoffs Has Been Worse Than Virat Kohli And Shubman Gill See Stats And Record | IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!

IPL Playoffs मध्ये कशी राहिलीये हिटमॅन रोहितची कामगिरी? विराट-गिल ठरलेत त्याच्यापेक्षा भारी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Rohit Sharma IPL Playoffs Record छ आयपीएलच्या १८ व्या हंगामातील प्लेऑफ्समधील एलिमिनेटरच्या लढतीत मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यातील सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर २ साठी पात्र ठरेल. दुसरीकडे पराभूत संघाचा यंदाचा हंगाम इथंच संपुष्टात येईल. पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पंजाबला शह देत थेट फायनल गाठली आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला फायनल गाठायची असेल तर आधी गुजरात टायटन्स आणि त्यानंतर पंजाब किंग्ज विरुद्धची लढाई जिंकावी लागेल. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सूर्या सातत्यपूर्ण कामगिरी करतो, पण रोहितलाही घ्यावा लागेल पुढाकार

हे दोन अडथळे पार करण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या संघाला फलंदाजीसह गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवावी लागेल. सध्याच्या घडीला मुंबई इंंडियन्सच्या संघाकडून फक्त सूर्यकुमार यादवच असा फलंदाज आहे ज्याने स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याचे दिसून येते. MI च्या संघाला फायनल गाठायची असेल तर रोहित शर्मालाही आपल्या भात्यातील धमक दाखवून द्यावी लागेल.

IPL 2025 Eliminator Match: ..अन् MI नं प्लेऑप्समधील मॅचसाठी एका खेळाडूवर केला सव्वा पाच कोटींचा खर्च

हिटमॅन प्लेऑफ्समध्ये ठरलाय फ्लॉप

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रोहित शर्माच्या भात्यातून दोन अर्धशतके आली आहेत. पण १३ सामन्यात त्याने फक्त ३२९ धावाच केल्या आहेत. आयपीएल प्लेऑफ्समधील त्याची कामगिरी MI चं टेन्शन वाढवणारी आहे.  रोहितनं आतापर्यंत प्लेऑफ्समधील २१ सामन्यात १५.८ च्या सरासरीसह १०८.९६ च्या सरासरीनं २ अर्धशतकासह फक्त ३१६ धावा काढल्या आहेत. त्याच्या तुलनेत गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलसह रॉयल चॅलेंजर्सच्या ताफ्यातून खेळणारा विराट कोहलीचा प्लेऑफ्समधील रेकॉर्ड भारी असल्याचे दिसते. 

विराट कोहली अन् शुबमन गिल जोडी ठरलीये रोहितपेक्षा भारी

विराट कोहलीनं प्लेऑफ्समधील १६ डावात १२०.८९ च्या स्ट्राइक रेटसह ३५३ धावा केल्या आहेत. नाबाद ७० धावा ही कोहलीची प्लेऑफ्समधील सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे शुबमन गिल या दोन्ही दिग्गजांवर भारी पडलाय. आतापर्यंत प्लेऑफ्समधील १० लढतीत त्याने १४५.४ च्या स्ट्राइक रेटसह ४७४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

Web Title: Rohit Sharma Performance In IPL Playoffs Has Been Worse Than Virat Kohli And Shubman Gill See Stats And Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.