मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कान टोचण्याची एकही संधी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दवडत नाही. इंडियन प्रीमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या लाजीरवाण्या कामगिरीनंतर गंभीरने कोहलीच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. सोमवारी पुन्हा एकदा त्याने कॅप्टन कोहलीवर निशाणा साधला. कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. पण,कर्णधार म्हणून त्याला रोहिल शर्माने तगडे आव्हान उभे केले आहे, असे मत व्यक्त करून त्याने कोहलीचे टेंशन वाढवले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार
गौतम गंभीरनं केलं पुन्हा कॅप्टन कोहलीला टार्गेट; म्हणाला संघात तुझ्यापेक्षा आहे सक्षम कर्णधार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे कान टोचण्याची एकही संधी भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीर दवडत नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 12:17 IST