Join us

Aus vs Ind: रोहित शर्मा निवृत्ती घेणार? मेलबर्नवर स्मिथच्या शतकामुळे घडू शकतो अजब-गजब योगायोग, कोणता ते जाणून घ्या

Rohit Sharma Retirement Steve Smith century at Melbourne, Aus vs Ind 4th Test : दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 15:57 IST

Open in App

Rohit Sharma Retirement Steve Smith century at Melbourne, Aus vs Ind 4th Test : भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर सामन्यावरील पकड अधिक मजबूत केली. स्टीव्ह स्मिथचे शतक (१४०) आणि सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबूशेन यांची अर्धशतके यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावांपर्यंत मजल मारली. याला प्रत्युत्तर देताना भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाच्या (८२) बळावर ५ बाद १६४ धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माच खराब फॉर्म या डावातही कायम राहिला. तो केवळ पाच चेंडू खेळून तीन धावांवर बाद झाला. रोहितच्या खराब कामगिरीनंतर चाहते त्याच्यावर प्रचंड चिडले आहेत. काहींनी त्याला थेट निवृत्ती घेण्याचाही सल्ला दिला आहे. पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? रोहित शर्मा खरंच निवृत्ती जाहीर करू शकतो असा एक विचित्र योगायोग जुळून आला आहे.

भारतीय कर्णधाराच्या निवृत्तीचा योगायोग

रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे चाहते त्याच्या निवृत्तीची मागणी करत आहेत. या संदर्भातील एक कनेक्शन हे स्टीव्ह स्मिथचे शतक आहे. २०१४च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मिथने बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले होते, तेव्हा भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कसोटीतून निवृत्ती घेतली होती. त्यावेळी धोनीही दोन कसोटी गमावल्यानंतर मेलबर्नला पोहोचला होता आणि सामना संपल्यानंतर त्याने ३० डिसेंबरला निवृत्ती जाहीर केली होती. स्मिथने यावेळी पुन्हा एकदा भारताविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीत शतक झळकावले आहे. रोहितही दोन कसोटी गमावल्यानंतर मेलबर्नला पोहोचला आहे. हा योगायोग आणि त्याची कामगिरी पाहता या सामन्यानंतर रोहित कर्णधारपदावरून पायउतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर करू शकतो.

ऑस्ट्रेलियाची सामन्यावर मजबूत पकड

प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या टॉप ४ फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पदार्पणवीर सॅम कॉन्स्टास (६०), उस्मान ख्वाजा (५७) आणि मार्नस लाबूशेन (७२) यांनी अर्धशतके ठोकली. तर स्टीव्ह स्मिथने १४० धावांची दमदार शतकी खेळी केली. स्मिथच्या खेळीत १३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तळाच्या फलंदाजांनीही भारताला चांगलेच झुंजवले. अलेक्स कॅरीने ३१, पॅट कमिन्सने ४९, मिचेल स्टार्कने १५, नॅथन लायनने १३ धावांची भर घातल संघाला साडे चारशेपार मजल मारून दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ४, रवींद्र जाडेजाने ३, आकाश दीपने २ तर वॉशिंग्टन सुंदरने १ बळी घेतला. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियास्टीव्हन स्मिथरोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ