ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

इंग्‍लंड दौऱ्याची ती पोस्ट अन् रोहितच्या कॅप्टन्सीची गॅरेंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 17:04 IST2025-08-09T16:54:19+5:302025-08-09T17:04:52+5:30

whatsapp join usJoin us
Rohit Sharma Lead Team India Till ODI World Cup 2027 ICC Poster | ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंड विरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांनाच धक्का दिला होता. त्याआधी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यावर त्याने क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे तो आता फक्त वनडेतच खेळताना दिसणार आहे. इंग्लंडच्या मैदानात शुबमन गिलनं कॅप्टन्सीत खास छाप सोडल्यावर रोहित शर्माची कॅप्टन्सी धोक्यात असल्याची चर्चा रंगताना दिसली. पण रोहित शर्मावर  किमान वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत तरी वनडेतील कॅप्टन्सी गमावण्याचा धक्का बसणार नाही, अशी गोष्ट समोर येत आहे. ICC च्या एका व्हायरल  पोस्टमधून त्याची हिंट मिळते आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

इंग्‍लंड दौऱ्याची ती पोस्ट अन् रोहितच्या कॅप्टन्सीची गॅरेंटी

भारतीय संघ २०२६ मध्ये मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. भारतीय  संघाच्या कसोटी दौऱ्याच्या दरम्यानच यासंदर्भातील माहिती समोर आली होती. आता आयसीसीने इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाच्या आगामी ५ टी-२० सामन्यासह ३ वनडे सामन्यासंदर्भातील मालिकेसंदर्भात एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक यांची झलक पाहायला मिळते. जर रोहित शर्मा २०२६ च्या इंग्लंड दौऱ्यावर वनडे संघाचा कर्णधार असेल तर तोच २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतही संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो, असे चित्र आयसीसीच्या या पोस्टमधून निर्माण होत आहे.

ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट

रोहित शर्माचा वनडेवर फोकस

टी २० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर रोहित शर्मा आता फक्त वनडे सामन्यावर फोकस करताना दिसेल. २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेवेळी टीम इंडिया कशी असेल? याचा अंदाज आता बांधणं कठीण आहे. पण रोहित शर्मा या स्पर्धेसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निरोप घेण्यास प्रयत्नशील असेल. गौतम गंभीरनं आगामी वनडे वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा फोकस टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर वय नाही  कामगिरी पाहून वनडे वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी केली जाईल, असेही  भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या एका प्रकारात खेळतोय त्या प्रकारात सर्वोत्तम कामगिरी दाखवून देत रोहित शर्मासह विराट कोहली वनडे वर्ल्ड कप संघात आपली दावेदारी भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. 

Web Title: Rohit Sharma Lead Team India Till ODI World Cup 2027 ICC Poster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.