Rohit Sharma Play Vijay Hazare Trophy : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोन्ही दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदिवसीय सामन्यात खेळताना दिसणार आहेत. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर या दोघांनीही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभागी होऊन मॅच प्रॅक्टिस आणि फिटनेस कायम ठेवावा, अशा सूचना त्यांना बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाकडून मिळाल्या आहेत. या गोष्टीची चर्चाही रंगली. आता यासंदर्भात रोहित शर्मानं पहिलं पाऊल उचलले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडेतील रुबाब कायम ठेवण्यासाठी हिटमॅनचा मोठा निर्णय
पीटीआयच्या वृत्तानुसार, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील प्रतिष्ठित अशा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईकडून खेळण्यासाठी रोहित शर्माने तयारी दर्शवली आहे. या स्पर्धेत मुंबई संघात निवडीसाठी उपलब्ध असेन, अशी माहिती रोहित शर्मानं मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवली आहे. एवढेच नाही तर खेळण्यासाठी उपलब्ध असल्याची माहिती त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली आहे. सैय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेटस्पर्धेत खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केल्याचे समजते. बीसीसीआयची ही अट मान्य करून रोहित शर्मानं वनडे करिअर टिकवत २०२७ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत संघात कायम राहण्यासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे संकेतच दिले आहेत.
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
विराट कोहलीचं काय?
विराट कोहलीला देखील आपला फॉर्म आणि फिटनेस दाखवण्यासाठी देशांतर्ग क्रिकेटमध्ये उतरावे लागेल. रोहित शर्मा पाठोपाठ टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर देशांतर्गत क्रिकेटचा छंद जपत वनडे संघातील निवडीचा मार्ग अधिक सोपा करण्यासाठी कोहली देखील रोहित शर्माला फॉलो करेल, असे वाटते. पण तो यासंदर्भातील निर्णय कधी घेणार ते पाहण्याजोगे असेल.
गत हंगामात रणजी स्पर्धेत खेळताना दिसली होती जोडी
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही दिग्गजांनी गत रणजी हंगामात प्रत्येकी एक एक सामना खेळल्याचे पाहायला मिळाले होते. विराट कोहली जानेवारीमध्ये तब्बल १२ वर्षांनी दिल्ली संघाकडून रणजी सामना खेळताना दिसला होता. दुसरीकडे रोहित शर्मा हा १० वर्षांनी मुंबई संघाकडून रणजी सामना खेळला होता.