Join us

रोहित शर्माच्या कॅप्टन्सी संदर्भात BCCI नं घेतला मोठा निर्णय; नेमकं काय ठरलं?

ठरलं रोहित शर्माच्या कॅप्टन्सीतच भारतीय संघ करणार नव्या मोहिमेची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:08 IST

Open in App

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला विक्रमी विजेतेपद मिळवून दिल्यावर सारे वारे आता कॅप्टन रोहित शर्माच्या बाजूने फिरल्याचे चित्र दिसून येत आहे. घरच्या मैदानातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत व्हाइट वॉशची नामुष्की आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पराभवानंतर भारतीय संघाची सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. पराभवाच्या मालिकेनंतर रोहित शर्माचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण याचंही उत्तर आता मिळाले आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!  

टीम इंडियाला चॅम्पियन्स करताच बीसीसीआय 

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच आता रोहित शर्मासंदर्भात 'ऑल इज वेल' गाणे वाजू लागले आहे. बीसीसीआयलाही त्याच्या नेतृत्वावर भरवसा असून तोच आगामी  मोठ्या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल, अशी माहिती समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसनं सूत्रांच्या हवाले दिलल्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह (BCCI) निवडकर्त्यांनी इंग्लंड दौऱ्यातील आगामी कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नेतृत्वातील कर्तृत्व सिद्ध करून दाखवले आहे, अशा सूरात बीसीसीआयने रोहित शर्माला पाठिंबा दिल्याचे  उल्लेख या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी त्याच्या निवृत्तीसह कॅप्टन्सी बदलाची चर्चा 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रोहित शर्माच्या निवृत्तीशिवाय भारतीय संघात खांदे पालट होण्याची चर्चा चांगलीच गाजली. पण टीम इंडियानं दुबईचं मैदान गाजवलं अन् रोहितसंदर्भातील उलट सुलट चर्चेला आता जणून ब्रेक लागला आहे. आधी रोहितनं वनडेतून निवृत्ती घेत नाही हे स्पष्ट केले. याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने कसोटी क्रिकेटमधून कुठंही जाणार नाही, हे स्पष्ट सांगितले होते.

टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्याचा प्लान ठरला 

भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेतून २०२५-२७ च्या आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.  रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघ नव्या मोहिमेची सुरुवात करेल, हे जवळपास निश्चित झाले आहे.  २० जून २०२५  ते ३ ऑगस्ट या कालावधीत भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

 

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ