Join us

Rohit Sharma Action, IPL 2022 MI vs KKR: अरे बापरे! Mumbai Indians च्या पराभवानंतर रागाच्या भरात रोहितने केलेल्या 'त्या' कृतीची चर्चा (Video)

रोहितचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 12:17 IST

Open in App

Rohit Sharma Action, IPL 2022 MI vs KKR Viral Video: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली Mumbai Indiansचा यंदाच्या हंगामातील सलग तिसरा पराभव झाला. काल झालेल्या सामन्यात कोलकाताने मुंबईच्या तोंडचा घास हिरावून नेला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारे खेळाडू त्यांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे यंदा मुंबईला हवा तसा सूर अद्यापही गवसलेला नाही. याचदरम्यान संघाच्या सततच्या पराभवामुळे कर्णधार हिटमॅनचा राग अनावर झाला आणि त्याने कालच्या सामन्यानंतर केलेली एक कृती चांगलीच चर्चेत आली.

कालच्या सामन्यात मुंबई संघाने बरेच बदल केले होते. त्यात या वर्षातील पहिला सामना खेळणाऱ्या सूर्यकुमारने अर्धशतक झळकावले. पण त्याला सहकारी फलंदाजांची साथ मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन हे KKRच्या गोलंदाजांसमोर फ्लॉप ठरले. त्याच वेळी संघाच्या गोलंदाजांनीही भरघोस धावा दिल्या. त्यामुळे सलग तिसरा सामना मुंबईला संघाला गमवावा लागला. संघाच्या सततच्या पराभवानंतर कर्णधार रोहितचा राग अनावर झाला. कॅमेऱ्यात ही गोष्ट कैद झाली. कालच्या सामन्यात कोलकाताने मुंबईवर ५ विकेट्सनी मात केली. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा प्रचंड रागात दिसला. माईकच्या आवाजाने हिटमॅनचा राग बाहेर आला. त्याने बाजूला असलेल्या माणसावरच राग काढला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, काल झालेल्या या सामन्यात पॅट कमिन्सने आपल्या बॅटची अशी ताकद दाखवली की मुंबईचे गोलंदाज त्यापुढे फिके पडले. कमिन्सने अवघ्या १४ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर १५व्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. याआधी IPLच्या इतिहासात केएल राहुलने १४ चेंडूत ५० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला होता. त्या विक्रमाशी पॅट कमिन्सने काल बरोबरी केली. 

टॅग्स :आयपीएल २०२२रोहित शर्मामुंबई इंडियन्ससोशल व्हायरलसोशल मीडिया
Open in App