Rohit Sharma Gautam Gambhir viral video: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका गमावली. पहिल्या दोनही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यात भारतीय क्रिकेटचाहत्यांना केवळ एक दिलासादायक बाब दिसली, ती म्हणजे रोहित शर्माची दमदार फलंदाजी. रोहितने पहिल्या सामन्यात अवघ्या ८ धावा केल्या. पण दुसऱ्या सामन्यात मात्र रोहित शर्माने टीकाकारांची बोलती बंद केली. रोहितने ९७ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. यात दोन षटकारांचाही समावेश होता. रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर निवृत्त होणार का, असा सवाल काही महिन्यांपासून विचारला जात होता. त्याला रोहितने आपल्या बॅटने उत्तर दिले. तशातच आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यातून रोहित निवृत्त होणार की आणखी खेळणार, याबाबत खुलासा होतो आहे.
हा व्हिडिओ अँडलेडमधील टीम हॉटेलचा आहे. टीम इंडियाचे खेळाडू सामना खेळल्यानंतर हॉटेलमध्ये परतताना दिसतात. यादरम्यान, हॉटेलच्या लॉबीमध्ये मुख्य प्रशिक्षक गंभीर, रोहित आणि गिल तिघे पुढे-मागे चालताना दिसतात. तितक्यात रोहितला गंभीर हाक मारतो. रोहित मागे वळून गंभीरचं बोलणं ऐकतो. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने असा दावा केला आहे की, रोहित शर्माशी संवाद साधणारा आवाज हा गौतम गंभीरचा आहे. व्हिडीओमध्ये गंभीर रोहितला म्हणतो, "सगळ्यांना असं वाटतंय की तुझा शेवटचा (फेयरवेल) सामना आहे, एक फोटो तर काढून घे." ते ऐकून रोहित आणि गिल दोघेही हसतात. मग रोहितही पुढे निघून जातो. पाहा व्हायरल व्हिडीओ-
दरम्यान, रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलिया दौरा खूपच महत्त्वाचा आहे. रोहितने या दौऱ्यासाठी फिटनेसवर खास लक्ष दिले होते. त्याने १० किलो वजनही कमी केले होते. आता रोहित केवळ एकच फॉरमॅटमध्ये खेळत असल्याने, सध्या त्याला फिटनेसवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. पण या व्हिडीओनंतर एक बाब मात्र स्पष्ट होते की, रोहित शर्मा एवढ्यात नक्कीच क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही.
Web Summary : After India's ODI series loss to Australia, a video shows Gautam Gambhir jokingly suggesting Rohit Sharma take a 'farewell' photo, fueling retirement speculation. Sharma's form and fitness suggest he will continue playing.
Web Summary : ऑस्ट्रेलिया से वनडे सीरीज हारने के बाद, एक वीडियो में गौतम गंभीर रोहित शर्मा को मज़ाकिया अंदाज़ में 'विदाई' फोटो लेने का सुझाव दे रहे हैं, जिससे संन्यास की अटकलें तेज़ हो गई हैं। शर्मा का फॉर्म और फिटनेस बताता है कि वे खेलते रहेंगे।