Join us

'लकी गर्ल'! भर रस्त्यात Rohit Sharma नं दिला चाहतीच्या हातात हात; अन्... VIDEO

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी रोहित शर्मा मुंबईतील रस्त्यावरून आपल्या अलिशान कारमधून फिरताना स्पॉट झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 17:56 IST

Open in App

Rohit Sharma Viral Video : भारतीय क्रिकेट संघाच्या वनडे आणि कसोटी संघाची धूरा सांभाळणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) फिल्डबाहेरील एका खास व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी तो मुंबईतील रस्त्यावरून आपल्या अलिशान कारमधून फिरताना स्पॉट झाले. रोहित शर्मानं कार थांबवून आपल्या एका चाहतीसोबत फोटोही काढला.

तरुणीच्या विनंतीवरून भारतीय कर्णधाराने फोटोसाठी पोझ दिलीच. पण यावेळी हस्तांदोलन करत त्याने या चाहतीला बर्थडेच्या शुभेच्छाही दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  रोहितची मुंबईच्या रस्त्यावर झाले  ग्रेट भेट  त्या तरुणीसाठी आयुष्यभर लक्षात राहिल अशीच होती. तिच्या चेहऱ्यावरील भावही हेच सांगत होते.  रोहित शर्मानं आपल्या याच अंदाजामुळे मोठा चाहतावर्ग कमावला आहे. त्याची ही झलक पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवायला मिळाली.   

रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल; ती खरंच ठरली 'लकी गर्ल'   

जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात रोहित शर्मा आपली अलिशान कार स्वत: ड्राइव्ह करताना दिसत आहे. सिग्नलवर कार थांबवल्यावर एक तरुणी अगदी उत्साहाने रोहितसोबत फोटो काढण्यासाठी त्याच्या कार जवळ आली. रोहितनंही तिला निराश केले नाही. फोटो क्लिक करत असताना या तरुणीचा मित्र रोहितला तिचा वाढदिवस असल्याचे सांगताना ऐकायला येते. त्यानंतर रोहितनं हातात हात देत या चाहतीला बर्थडेच्या शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळते. रोहित शर्माचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्यासोबत फोटो काढण्याची संधी मिळणं म्हणजे त्याच्या चाहत्यासाठी मोठं भाग्य लाभल्यासारखेच आहे. संबंधित तरुणीला फोटो तर मिळालाच पण रोहितकडून शुभेच्छा मिळाल्यामुळे तिचा बर्थडे अविस्मरणीय झाला. 

रोहित शर्माची क्रेझ; एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी केली मोठी गर्दी  

याशिवाय रोहितचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेआधी रोहित शर्मा प्रॅक्टिससाठी मुंबईतील जिओ पार्क परिसरातील स्टेडियमवर गेला होता. निळ्या रंगाच्या आपल्या लॅम्बोर्गिनीतून आलेल्या रोहितची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केल्याचेही यावेळी दिसून आले.  "मुंबईचा राजा, रोहित शर्मा..." अशी घोषणाबाजी करत चाहत्यांनी भारतीय संघाच्या कर्णधारावरील प्रेम व्यक्त केल्याचा सीन पाहायला मिळाला. हा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 

टॅग्स :रोहित शर्माऑफ द फिल्डभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ